mansukh hiren

मनसुख हिरेन प्रकरणी(mansukh hiren murder case) एटीएस टीमने आता चौथ्या आरोपीला अटक केली आहे. तत्पूर्वी ठाणे एटीएसने बुकी असलेले नरेश गौर आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला अटक केली आहे.

    ठाणे : मनसुख हिरेन प्रकरणी(mansukh hiren murder case) एटीएस टीमने आता चौथ्या आरोपीला अटक केली आहे. तत्पूर्वी ठाणे एटीएसने बुकी असलेले नरेश गौर आणि पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे याला अटक केली आहे. मनसुख हत्ये प्रकरणात आरोपी म्हणून सचिन वाझे याचाही सभाग असून आता ठाणे एटीएसने चौथा आरोपी किशोर ठक्कर याला अटक केली आहे. मंगळवारी ठाणे एटीएसने किशोर ठक्कर आणि दमण वरून आणलेली व्हॉल्वो गाडी एनआयएच्या स्वाधीन केली आहे.

    ठाणे एटीएस पथकाने मनसुख हिरेन प्रकरणी अटक केलेला आरोपी किशोर ठक्कर याचा बुकींचा व्यवसाय असून त्याचा सिमकार्ड विक्रीचाही धंदा असलयाचे एटीएस पथकाने सांगितले. एटीएस पथकाने किशोर ठक्कर यांच्याकडून १५ सिमकार्ड हस्तगत केले आहेत. तर दुसरीकडे एनआयए शोधत असलेली व्हॉल्वो कार २२ मार्च रोजी एटीएस पथकाने दमण मधून हस्तगत केली. गाडीचे मालक अभिषेक अग्रवाल(नाथानी) याची चौकशी केली असून जबाब नोंदविण्यात आला आहे. मंगळवारी ठाणे एटीएसने अटक केलेला बुकी आरोपी किशोर ठक्कर यांच्यासह व्हॉल्वो कार ही टॉविंग करून मुंबईच्या एनआयएच्या स्वाधीन केली. जिलेटीन कांड्या आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास सध्या एनआयए करीत असल्याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आरोपींची संख्या ४ वारगेलेली असून त्यात दोन पोलीस विभागातील आहेत तर दोन बुकींचा समावेश आहे.