पैशांच्या हव्यासापोटी मित्राचाच घेतला बळी, पोलिसांनी ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

ठाणे जिल्हा  न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांनी सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत आरोपी अनिल वाल्मिकी(२८) याला दोषी ठरवीत जन्मठेप आणि पाच हजाराचा दंड अशी  शिक्षा ठोठावली. 

ठाणे : उधार घेतलेले पाच देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या मित्राची हत्या करणाऱ्या तरुणाला ठाणे जिल्हा  न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांनी सादर साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरीत आरोपी अनिल वाल्मिकी(२८) याला दोषी ठरवीत जन्मठेप आणि पाच हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

हत्येची घटना ठाण्याच्या शास्त्रीनगर परिसरात घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात ३१ जुलै, २०१५ रोजी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी अनिल वाल्मिकी याला अटक करण्यात आलेली होती. अनिल वाल्मिकी याने मृतक सुधीर सिंह(३३) याला पाच हजार  होते. ते देण्यास टाळाटाळ करीत होता. दरम्यान ३१ जुलै,२०१५ मध्ये मृतक सुधीर सिंह हा घरातून बाहेर पडला तो परत आला नाही. १ ऑगस्ट, २०१५ रोजी सुधीरची पत्नी राणी सिंह यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात मृतक सुधीर हरविल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर वर्तकनगर पोलिसांनी अनिल वाल्मिकी याची चौकशी केल्यानंतर आरोपी अनिल वाल्मिकी यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

५ हजार रुपये सुधीरला उधार दिले होते. ते देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने दोघे मद्यधुंद अवस्थेत दोघे  क्रमांक ४३ च्या  मैदानात असताना झालेल्या वादावादीत अनिलने मृतक सुधीरच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला. यात सुधीरचा मृत्यू झाला. सदर प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एच.एम. पटवर्धन यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आले होते. सरकारी वकील वर्ष चंदने यांचा युक्तीवाद आणि वर्तकनगर पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार गराच्या धरीत आरोपी अनिल वाल्मिकी याला दोषी ठरवीत पाच हजाराचा दंड आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.