ठाण्यात २६ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल -आरोपी फरार

ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या(Kasarvadavali Police Station)हद्दीत २६ वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार(Thane Gang Rape) केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात(Thane Crime) चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत.

    ठाणे : मुंबई(Mumbai),कल्याण(Kalyan) आणि डोंबिवली(Dombivali) परिसरात घडलेल्या कलंकित घटनाची पुनरावृत्ती ठाण्यात झाल्याची घटना प्रकाशझोतात आली आहे.(Thane Gang Rape) ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या(Kasarvadavali Police Station)हद्दीत २६ वर्षीय तरुणीवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. सदर फरारी आरोपींचा शोध कासारवडवली पोलीस करीत आहे.

    ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात २६ वर्षीय तरुणीने दाखल केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्याप्रकरणी तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार कासारवडवली पोलिसांनी चार जणांच्या विरोधात कलम ३७६, ३७७, ३५४, ४२०, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सर्व आरोपी फरार असून कासारवडवली पोलीस ठाण्याची पोलीस पथके फरारी आरोपींचा शोध घेत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार पीडित २६ वर्षीय तरुणी ही बारबाला असून ती बारमध्ये वेटरचे काम करीत होती. त्याच दरम्यान बारमध्येच तिची ओळख गोविंद राजभर (३२) (रा. नालासोपारा ठाणे) याच्याशी झाली. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले.  प्रियकर गोविंद राजभर याने पीडितेकडून घर खरेदी करण्याकरिता ७ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज घेतला. पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा शारिरक उपभोग घेतला.त्यानंतर प्रियकर गोविंद राजभर याने पीडितेचे अश्लील चित्रण केले. गोविंद राजभर याने अश्लील चित्रफित दाखवून पीडितेला ठाण्याच्या विविध लॉजवर नेत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाण देखील केली. पीडितेस धमकावून आरोपीच्या इतर तीन साथीदारांनीदेखील पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सर्व आरोपी फरार आहेत. आरोपींच्या शोधासाठी दोन पोलीस पथके नेमण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.प्रियकर गोविंद राजभर आणि अन्य तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी कासारवडवली पोलिसांनी दोन विविध पथके तयार करून आरोपींचा शोध घेत आहेत.