एकांतात बडबड करण्याची सवय लावावी! राज ठाकरेंचे संजय राऊतांवर पुन्हा टीकास्त्र

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता एकांतात बडबड करण्याची सवय लावावी अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसे चे एकमेव आमदार राजु पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर देत वरील उद्गार काढले(Get in the habit of blabbering on like this! Raj Thackeray castigates Sanjay Raut again).

    ठाणे : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आता एकांतात बडबड करण्याची सवय लावावी अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मनसे चे एकमेव आमदार राजु पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्दघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या पुण्यातील सभेत सेना नेते संजय राऊत यांची नक्कल केली होती, त्यावर संजय राऊत यांनी मिमिक्री करून राजकारण होत नाही असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता. यावर राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर देत वरील उद्गार काढले(Get in the habit of blabbering on like this! Raj Thackeray castigates Sanjay Raut again).

    राऊतांनी एकांतात बडबड करण्याची सवय लावून घ्यावी असा टोला राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या राज्यातील मनसे पदाधिकारी आणि मनसे च्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. याचाच भाग म्हणुन मनसे आमदार राजु पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच राज ठाकरे यांनी उद्दघाटन केलं आहे. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत,अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे उपस्थित होते.

    मनसे आमदार राजु पाटील यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला असुन दिवसेंदिवस दिवावासियांचा मनसेकडे ओढा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सहज संपर्क साधता यावा यासाठी दिवा पूर्व येथील दिवा-शीळ रोडवरील चंद्रांगण रेसिडेन्सीमध्ये आ.राजु पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याहस्ते शनिवारी सायंकाळी पार पडला. याप्रसंगी,मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, मनसे महिलाध्यक्षा समिशा मार्कंडे आदींसह मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.