प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्यास आलेल्या अभय योजना-2020 योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे पत्र मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना दिले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना करामध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली असल्याने त्याचा फायदा नागरिकांना मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

डोंबिवली (Dombiwali).  कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी लागू करण्यास आलेल्या अभय योजना-2020 योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी मुदतवाढ द्यावी अशा मागणीचे पत्र मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांना दिले आहे. महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना करामध्ये काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी अभय योजना लागू करण्यात आली असल्याने त्याचा फायदा नागरिकांना मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

पाटील यांनी असेही म्हटले आहे की, योजनेचा कालावधी १५ ऑक्टोंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० असा ठेवण्यात आला असला तरी अभय योजनेमार्फत करदात्यांना सवलत देण्यासाठी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये मार्च २०२० पासून सुरु झालेल्या कोविड-२० च्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी शहरातील लॉकडाऊनमुळे उद्योग/व्यवसाय बंद झाल्याने व रोजगार बंद झाल्याने अनेक नागरीकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच पूर्ण पगार मिळत नसल्याने नागरीकांच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे करवसुलीवर विपरीत परिणाम होत असल्याने कर वसुलीत वाढ करण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे प्रकरण-आठ, कराधान नियम ५१ अन्वये आपणास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अभय योजना – २०२० लागू करण्यात आली आहे.

परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. कोविड-१९ चा प्रादुर्भाव अद्यापही संपलेला नाही. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्य नागरीकांसाठी सुरु झालेली नसून राज्यातील लॉकडाऊन आजही पूर्णपणे उठविण्यात आलेला नाही. सध्या तर राज्यातील बहुतांश शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उद्योग/व्यवसाय पूर्णपणे सुरु झालेले नसून सर्वसामान्य नागरीक अधिकच आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. परिणामी आपण जाहिर केलेल्या १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील अभय योजनेचा फायदा बहुतांश नागरिकांना घेता आलेला नाही. तरी कृपया आपल्या अधिकारांचा वापर करुन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना दिलासा देण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अभय योजनेचा कालावधी ३१ डिसेंबर २०२० रोजी समाप्त न करता, सदर योजनेस पुढील किमान ६ महिने मुदवाढ देऊन सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देऊन सहकार्य केले पाहिजे असे म्हटले आहे.