
आज सकाळपासूनच पावसाने ठाणे(Thane) आणि पालघर(Palghar) जिल्ह्यात जोरदार हजेरी(Heavy Rain) लावली.
ठाणे: ठाणे(Thane) आणि पालघर(Palghar) जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस(Heavy Rain In Thane And Palghar District) सुरु आहे. आजही सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या लोकांची धांदल उडाली. ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी(Bhivandi), बदलापूर(Badlapur), कल्याण (kalyan), अंबरनाथ(Ambernath), उल्हासनगर(Ulhasnagar) आणि डोंबिवली(Dombivali) परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला.
सकाळपासूनच पावसाने ठाणे(Thane) आणि पालघर(Palghar) जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत. आकाश काळेकुट्ट झाल्याने दिवसभर पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या शहरातील सखल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.
पालघर जिल्ह्यातही गेले ३ दिवस सलग पाऊस सुरु आहे. पालघर, चिंचणी, जव्हार, मोखाडा, डहाणू भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसाने पालघरमधील भात शेतीला झोडपले आहे. भात उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.वसई, विरार, नालासोपारामध्ये रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पावसाने हजेरी लावायला सुरवात केली आहे. सध्या शहरातील सकल भागात कुठेही पाणी साचलेले नाही.
औरंगाबाद शहरात दुपारपासूनच ढगांचा गडगडाट सुरु होता. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. तसेच पैठण, पाचोड, सिल्लोड, करमाड भागातही धुवांधार पाऊस सुरु झाला. मराठवाड्यातील जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.
प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, परभणी, लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यात २२ सप्टेंबर रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.