प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अज्ञात वाहनाने दोन दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना माजिवडा उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

ठाणे (Thane).  अज्ञात वाहनाने दोन दुचाकीस्वारांना दिलेल्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना माजिवडा उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

मानपाडा परिसरातील शिवाजीनगर परिसरात राहणारे मोहम्मद अरशद अन्सारी(३७) आणि फिरोज अहमद अन्सारी(२६) हे आपल्या दुचाकी बाईकने शुक्रवारी तीन वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त माजिवडा उड्डाणपुलावरून जात होते. या दरम्यान मागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने बाईकला दिलेल्या जोरदार धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. वाहनचालकाने जखमींना रुग्णसेवा देण्यापूर्वीच वाहनासह पलायन केले.

अपघाताची माहिती मिळताच कापूरबावडी पोईस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक पी आर. साळवे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उशीर झाल्याने डॉक्टरांनी दोघं तरुणांना मृत घोषित केले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले. कापूरबावडी पोलीस होण्यात अपघात प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर वाहन चालक आणि वाहनांचा शोध पोलीस घेत आहेत.