hukka parlour

ठाणे पालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच अशा हुक्का पार्लवर कारवाई(action on hukka parlor) करण्याचे आदेश दिले असताना अधिकाऱ्यांनी केवळ घोडबंदर परिसरात कारवाई करण्याचा दिखावा केला.सध्या संचारबंदी असतानाही लाउंड आणि हुक्का पार्लर साडेअकरानंतरही सुरू असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचा आरोप मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला.

ठाणे : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्यांकडून सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी होऊ शकते. त्यामुळे ५ जूनपर्यंत संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र  हुक्का पार्लर(hukka parlor) आणि लाउंज यांनी नव्या वर्षासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. ठाणे पालिका आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच अशा हुक्का पार्लवर कारवाई(action on hukka parlor) करण्याचे आदेश दिले असताना अधिकाऱ्यांनी केवळ घोडबंदर परिसरात कारवाई करण्याचा दिखावा केला. शिवाय सध्या संचारबंदी असतानाही लाउंड आणि हुक्का पार्लर साडेअकरानंतरही सुरू असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचा आरोप मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी केला.

संचारबंदी असतानाही ३१ डिसेंबरला ठाण्यात येऊरमधील हॉटेल्स, धाबे, हुक्का पार्लर हे रात्र गाजविणार असून ठाणे पोलिसांना आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांना हे मोठे आव्हान आहे.

चार वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल येथील पबला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत चौदा जणांचा बळी गेला. या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच प्रशासनाने अशा अवैध लाउंज व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केली.

माहितीच्या अधिकारात हुक्का पार्लर आणि लाउंजला परवाने आहेत काय याची माहिती मागविली मात्र परवानगी दिली नसल्याचे उत्तर आले. तरीही लाउंज आणि हुक्का पार्लर सुरूच होते. तीन वर्षांपूर्वी हुक्का पार्लरवर बंदी आणली तरी तंबाखूमुक्त म्हणजेच हर्बल हुक्का पार्लरसाठी न्यायालयाने रेस्टॉरंट चालकांना दिलासा दिला. मात्र आज ही हर्बल हुक्काच्या नावाखाली अंमली पदार्थांच्या हुक्कांचा धूर ठाणे शहरात तरूणाई उडवत आहे. शहरातील घोडबंदर परिसरासह ठाणे शहरातील अनेक ठिकाणी अवैध लाउंज व हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उघडकीस आली आहे. या हुक्का पार्लर रेस्टॉरंटचा अग्निशमन परवाना नसल्याचीही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पालिका आयुक्तांच्या आदेशावर कारवाईचा दिखावा
ठाणे पालिका आयुक्तांनी शहरातील अवैध लाउंज व हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पण अधिकाऱ्यांनी केवळ घोडबंदर परिसरातील एक-दोन लाउंज व हुक्क पार्लरवर कारवाई करत दिखावा केला. पण आजही घोडबंदरसह शहरातील अनेक ठिकाणी अवैध लाउंज व हुक्का पार्लर सुरू आहे. अग्निशमन परवाना नसतानाही हुक्का पार्लवर कारवाई का होत नाही?, असा सवाल मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी प्रशासनाकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला आहे. हुक्का पार्लरवर ठोस कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्ववारे केली.

जाणीवपूर्वक दुर्लक्ष
ठाण्यातील येऊर,कोठारी कंपाऊंड, घोडबंदर रोड येथे हुक्का पार्लर व लोउंज बार राजरोज सुरू आहेत . तर वेळेच्या मर्यादेपलीकडे सुरू असलेले हुक्का पार्लर व लाउंज वर्दळीच्या ठिकाणी असतानाही याबाबत पालिका प्रशासन मात्र याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करत करत असल्याचा आरोप मनसेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्षांनी केला आहे.

ठाणे शहराला लागलेल्या हुक्का संस्कृतीचे ग्रहण, कायद्याची होणारी पायमल्ली, आयुक्तांच्या आदेशाला दिखाऊ कारवाईची पाने पुसणे, अग्निशमन दलाची परवानगी नाही, माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती, अनेक तक्रारीनंतरही हुक्का पार्लरमधून धूर बाहेर पडत होता. पूर्वी गिरणीच्या चिमण्यातून धूर निघत होता. आता ठिकठिकाणी शहरात हुक्का पार्लरच्या चिमण्यातून धूर निघतो आहे. प्रशासनाच्या कारवाईच्या अभावाने हुक्का पार्लर संस्कृती ठाण्यात फोफावलेली आहे. आज नाही तर उद्या ही हुक्का पार्लर संस्कृती ठाणेकरांची सामाजिक समस्या बनणार आहे.

- स्वप्नील महिन्द्रीकर ( मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष)