कल्याण डोंबिवलीमध्ये १०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या ५७ हजार पार गेली असून आज नव्या १०० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या ५७ हजार पार गेली असून आज नव्या १०० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या १०० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,०६६ झाली आहे. यामध्ये १०७३ रुग्ण उपचार घेत असून ५४,८९७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प – ३६, डोंबिवली पूर्व –२९, डोंबिवली प – २०, मांडा टिटवाळा -३, तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.