crime scene

जबरदस्ती लग्नाची मागणी करत संबधीत तरुणीच्या चार वर्षाच्या लहान भावाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अवघ्या 5 तासात तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.

    नवी मुंबई : जबरदस्ती लग्नाची मागणी करत संबधीत तरुणीच्या चार वर्षाच्या लहान भावाचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अवघ्या 5 तासात तळोजा पोलिसांनी अटक केली आहे.

    25 वर्षांचा हा आरोपीने पेंधरगाव येथील एक 23 वर्षीय महिलेला चार महिन्यापूर्वी लग्नाची मागणी केली. हा आरोपी महिलेच्या घरा शेजारी राहत होता.

    यानंतरही तो वारंवार तरुणीला लग्नाची मागणी घालत होता. परंतु महिलेला तो पसंत नव्हता. आरोपीने महिलेला लग्न नाही केलं तर तुझ्या लहान भावाला अपहरण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता.

    यानंतर 17 तारखेला त्याने या लहान मुलाचे अपहरण केलं होतं. सदर महिलेने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अवघ्या 5 तासात आरोपीला भिवंडी येथून अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली.