congress press conference at thane

ठाणे महापलिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अनधिकृत फेरीवाले(illegal hawkers), अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून(illegal builders) दर महिन्याला ३ करोडचा हप्ता मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण(vikrant chavhan) यांनी केला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कोविड काळात अनधिकृत बांधकामांनी(illegal construction) डोके वर काढले आहे. त्यामुळे ठाणे भारतीय काँग्रेस(congress) अनधिकृत बांधकाम विरोधात एल्गार पुकारणार आहे. ठाणे महापलिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अनधिकृत फेरीवाले(illegal hawkers), अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून(illegal builders) दर महिन्याला ३ करोडचा हप्ता मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण(vikrant chavhan) यांनी केला आहे.

चव्हाण यांनी केलेल्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून ठाणे महापलिकेतला तो अधिकारी कोण ? याची सीआयडी चौकशी मागणी देखील काँग्रेस नगरसेवक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषदेत आपली आगामी भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे,शहर काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन शिंदे,प्रवक्ता गिरीष कोळी व सरचिटणीस विजय बनसोडे यांच्या उपस्थित होते.

ठाण्यातील अनधिकृत बांधकामाच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन काँग्रेसने या बाधकामा विरोधात तसेच या बांधकामांना अभय देणा-या सर्वच घटकां विरोधात ठाणे काॅग्रेस एल्गार पुकारणार असून मंगळवार पासून याची सुरूवात होणार असल्याची माहिती शहर काँग्रेस अध्यक्ष अँड विक्रांत चव्हाण यांनी दिली. खरेतर नवीन आयुक्तांकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या परंतु काही अधिकारी व बांधकाम माफीयाच्या संगमताने हि बाधकामे सुरूच आहेत. अनधिकृत बांधकाम व फेरिवाल्याकडून काही अधिकाऱ्यांना ३ करोड रूपयाचा हप्त्या पोहचत असल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी करत याची सीआयडी  चौकशीची मागणीही केली.

या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे एक रॅकेट असून आता काँग्रेसचे पदाधिकारी अनेक ठिकाणी प्रभाग समिती कार्यालयासमोर आंदोलन करून विरोध करणार आहेत. याची सुरूवात मंगळवारपासून करण्यात येणार असून दिवा प्रभाग समिती कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

क्लस्टर योजना लागू करण्यात आल्यापासून अद्याप त्याचे काही झाले नाही. या योजनेमध्ये पारदर्शकता आणावी यासाठी येत्या काही दिवसांमध्ये ठाणे काँग्रेसच्या वतीने ठाणे शहरात लॉंग मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ठाणे शहर अध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले. क्लस्टर योजनेमध्ये संभ्रम निर्माण झाला असून चुकीच्या पद्धतीने क्लस्टर योजना राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.क्लस्टर योजनेला आमचा विरोध नसून सर्वाना विश्वासात घेऊन ही योजना राबवावी असे विक्रांत चव्हाण यांनी यावेळी सांगितले.