डोंबिवलीत बापानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

9 वर्षीय अल्पवयीन पीडिता डोंबिवलीमध्ये आई वडिलां सोबत राहते. बायको कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून आरोपी बापाने स्वत:च्याच लेकीवर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर शिवीगाळ, मारहाण करत तिला धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आपल्या आईला सर्व घडलेला प्रकार सांगीतला.

    डोंबिवली : आपल्या पोटच्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना डोंबिवली पश्चिमेत उघली आहे. इतकेच नव्हे हा नराधम स्वतःच्या आठ महिन्याच्या मुलीला जबदरस्तीने दारू पाजयचा. त्याच्या या निचपणाला विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला देखील आरोपी बेदम मारहाण करायचा.

    या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या तक्रारी नुसार पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. आज या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल बसे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले.

    सदर 9 वर्षीय अल्पवयीन पीडिता डोंबिवलीमध्ये आई वडिलां सोबत राहते. बायको कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून आरोपी बापाने स्वत:च्याच लेकीवर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर शिवीगाळ, मारहाण करत तिला धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने याबाबत आपल्या आईला सर्व घडलेला प्रकार सांगीतला.

    यानंतरही आरोपी मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन बायकोशी भांडायचा आणि आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजत असे, याला विरोध केला म्हणून त्याने आपल्या पत्नीला देखील बेदम मारहाण केली. अखेर या प्रकरणी सदर पिडीतीने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी विकृत बापाला बेड्या ठोकल्या आहेत. आज या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल असे पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांनी सांगितले.