उल्हासनगर मध्ये भाजपला खिंडार, 21 नगरसेवकांसह 114 जणांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र,आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे. टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे 21 नगरसेवक, 19 माजी नगरसेवक, वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे 114 जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद लक्षणीय रित्या वाढली आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसने आज उल्हासनगरमध्ये भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. भाजपच्या 32 पैकी 21 नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे 114 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझ्या उपस्थिती मध्ये पक्षप्रवेश केला.

    यावेळी ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे – पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देखील दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली.

    उल्हासनगरमध्ये गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र,आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे. टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे 21 नगरसेवक, 19 माजी नगरसेवक, वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे 114 जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाची ताकद लक्षणीय रित्या वाढली आहे.

    यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना मी म्हणालो की, “कलानी कुटुंबीयांसह अनेक नगरसेवकांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून या सर्वांना पक्षात प्रवेश दिला आहे.

    या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची उल्हासनगर पंचक्रोशीमध्ये ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता निर्माण झाली आहे…!”