vijay suryavanshi

कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (KDMC Commissioner Vijay Suryavanshi Tested Corona Positive) हे कोरोनाबाधित झाले आहेत.

    कल्याण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Corona Spread) लक्षात घेऊन शासनाने बुस्टर डोस (Booster Dose) देण्यास सुरवात केली आहे. हा बुस्टर डोस घेऊन देखील कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (KDMC Commissioner Vijay Suryavanshi Tested Corona Positive) हे कोरोनाबाधित झाले आहेत.

    मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मनपाच्या आयुक्त दालनात कोरोनाने शिरकाव केला असल्याचे दिसत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकुती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. मनपा आयुक्त कोरोनाबाधित झाल्यानंतर आज महापालिका मुख्यालयात सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे नागरिकांना मुख्यालयात प्रवेश न देता सुरक्षा रक्षकांकडून मुख्य गेटवरच थांबवून विचारपूस करण्यात येत होती.

    दरम्यान याबाबत पालिका आयुक्तांशी संपर्क साधला असता, आपला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून गृहविलगीकरणात उपचार सुरु आहेत. नागरिकांनी देखील आपली काळजी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.