drone use by police

कल्याण डोंबिवलीमधील थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर(thirty first celebration) पोलिसांची करडी नजर असणार असून या सेलिब्रेशनवर नजर ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनची मदत(drone watch by police in kalyan dombivali) घेणार आहेत.

कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनवर(thirty first celebration) पोलिसांची करडी नजर असणार असून या सेलिब्रेशनवर नजर ठेवण्यासाठी पोलीस ड्रोनची मदत(drone watch by police in kalyan dombivali) घेणार आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील नाईट कर्फ्यू जाहीर केला आह. त्या अनुषांगाने कल्याण डोंबिवली आणि परिमंडल ३ परिसरात कुठेही रात्री ११ नंतर ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन कोणतेही नववर्षाच स्वागत किंवा इतर कार्यक्रम करणार नाहीत, यासाठी काटेकोर नियोजन आणि बंदोबस्त लावला आहे. त्यानुसार दुर्गाडी नाका, गांधारी नाका, शहाड ब्रिज, पलावा ब्रिज, बदलापूर नाका आणि टाटा पॉवर हाउस नाका या ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. याठिकाणी बारकाईने सर्व वाहनचालक आणि प्रवासी यांची मद्यसेवन आणि इतर तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोना संबंधीच्या मास्क आणि इतर बाबतीतची तपासणी देखील होणार असून, सोसायटीच्या आवारात किंवा टेरेसवर एकत्र येऊन सेलिब्रेशनकरून कोरोनाला आमंत्रण देऊ नये यासाठी लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार असून पोलिसांची २० विशेष पथके तळीरामांवर नजर ठेवणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.