Kalyan Dombivali's Skywalk will be shuttered

मागील काही दिवसात उल्हासनगर, कल्याण रेल्वेच्या पादचारी पुलावर घडणाऱ्या गैरकृत्याची संख्या वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा(kalyan dombivli skywalk) पादचारी पूल शटर लावून बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे दिला आहे. या वर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेत स्कायवाकच्या प्रवेश द्वारला शटर लावत शेवटची लोकल मार्गस्थ झाल्यानंतर पहिली लोकल पर्यतच्या ३ तासासाठी प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

    कल्याण : मागील काही दिवसात उल्हासनगर, कल्याण रेल्वेच्या पादचारी पुलावर घडणाऱ्या गैरकृत्याची संख्या वाढत असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा(kalyan dombivli skywalk) पादचारी पूल शटर लावून बंद करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे दिला आहे. या वर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेत स्कायवाकच्या प्रवेश द्वारला शटर लावत शेवटची लोकल मार्गस्थ झाल्यानंतर पहिली लोकल पर्यतच्या ३ तासासाठी प्रवेशद्वार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

    कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी १०० कोटी खर्चून स्कायवाक उभारण्यात आले असले तरी या स्कायवॉकवर गर्दुल्ले, नशेबाज, वारांगना यांचा वावर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक या स्कायवाकचा वापर करण्यास घाबरतात. अनेकदा वारांगना आणि गर्दुल्ले मिळून स्कायवॉकवरुन जाणाऱ्यांना अडवून धमाकावून तसेच वार करत त्यांच्याकडे असलेल्या किंमती वस्तू आणि पैसे जबरदस्तीने काढून घेतात.

    पोलिसांकडे अनेक तक्रारी येत असल्याने स्कायवॉकच्या जिन्यावर शटर लावून पुलाची प्रवेशद्वार बंद करण्याचा प्रस्ताव रेल्वे पोलिसांनी मांडला असून यावर पालिका प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेत कल्याण डोंबिवली परिसरातील स्कायवाकच्या प्रवेश द्वारला शटर लावले असून लवकरच शेवटची लोकल मार्गस्थ झाल्यानंतर पहिली लोकलपर्यतच्या ३ तासासाठी हा प्रवेशद्वार बंद ठेवली जाणार असल्याचे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.