thane criminal

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या(kasarvadavli police station) हद्दीत हत्या(murder) आणि मोक्काचा फरार आरोपी पोलिसांच्या शोध मोहिमेत जाळ्यात(accused arrested) अडकला.

ठाणे : कासारवडवली पोलीस ठाण्याच्या(kasarvadavli police station) हद्दीत हत्या(murder) आणि मोक्काचा फरार आरोपी पोलिसांच्या शोध मोहिमेत जाळ्यात(accused arrested) अडकला. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केलेली आहे.

कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया यांच्यात झालेल्या वाढीचा निपटारा करण्यासाठी कासारवडवली पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीत गुन्हेगारांची शोध मोहीम सुरु केलेली होती. शुक्रवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाच्या एका टीमने घोडबंदर रोड आनंदनगर बस स्टॉपजवळ सापळा रचला. तेव्हा घटनास्थळी एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत होता. काही वेळाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

आरोपी हा कॅसलमील निवासी असून त्याचे नाव अभिमन्यू तिवारी असल्याचे तपासात समोर आले. त्याच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या चौकशीत आरोपीने डेक्कन पुणे परिसरात २०१८ साली हत्या केली होती. तर त्याच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आलेली होती. गुन्हा करून आरोपी तिवारी हा फरार व्हायचा त्याचा शोध पोलीस घ्यायचे . मात्र तिवारी हा कासारवडवली पोलिसांच्या एका टीमच्या जाळ्यात अडकला. कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.