कल्याण डोंबिवलीमध्ये आज ४२ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला ५०० वर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवशी तब्बल ४२ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील ५३ वर्षीय

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवशी तब्बल ४२ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील ५३ वर्षीय  एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या या ४२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने  ५०० चा आकडा गाठला आहे. यापैकी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून १८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३०९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या या ४२  रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १५, कल्याण पश्चिमेतील ११, डोंबिवली पूर्वेतील ३, डोंबिवली पश्चिमेतील १० आणि  टिटवाळा  येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.