कल्याण डोंबिवलीत ४६ नवीन रुग्ण – कोरोना रुग्णांची संख्या ७७३

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ४६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ४६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ७७३ झाली आहे.

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ४६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ४६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या   ७७३ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून २७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ४८४ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या या ४६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २६, कल्याण पश्चिमेतील ४, डोंबिवली पूर्वेतील ६, डोंबिवली पश्चिमेतील १० रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमध्ये २९ पुरुष, १३  महिला, २ बालक आणि २ बालिकांचा समावेश आहे.

आज आढळलेले हे रुग्ण कल्याण पूर्वेतील सूचकनाका, खडेगोळवली, गणेशवाडी, विजयनगर, तिसगाव, कैलासनगर, कोळशेवाडी, आनंदवाडी, पुनालिंक रोड, लोकग्राम, संतोष नगर, नांदिवली, तिसगावपाडा, नेतिवली मेट्रो मॉल समोर, तिसगाव, कल्याण पश्चिमेतील बेतूरकरपाडा, भारताचार्य चौक, वल्लीपीर रोड, टावरी पाडा,  डोंबिवली पूर्वेतील आजदे, मानपाडा, नांदिवली, रामनगर, आयरे रोड,  डोंबिवली पश्चिमेतील कोपरगाव, भागशाळा मैदानाजवळ, आंनदनगर, मोठा गाव, चिंचोळीपाडा, महात्माफुले रोड, रेतीबंदर रोड या परिसरातील आहेत.