कल्याण डोंबिवलीमध्ये आज १२ कोरोनाबाधितांची नोंद

कल्याण : कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांमुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या ९७ झाली असून आतापर्यंत ३३ जणांना डिस्चार्ज दिला असून

कल्याण : कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांमुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या ९७ झाली असून आतापर्यंत ३३ जणांना डिस्चार्ज दिला असून ६१ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या १२ रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेतील ७, डोंबिवली पश्चिमेतील १, कल्याण पूर्वेतील ३ तर आंबिवली येथील १ रुग्ण आहे. यामध्ये डोंबिवली पूर्वेतील ५१ वर्षीय महिला, ३७ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला आणि २७ वर्षीय पुरुष हे ४  रुग्ण  कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासीत आहेत. तर ५९ वर्षीय महिला, ५१ वर्षीय महिला आणि ७१ वर्षीय पुरुष हे ३ जण डायलिसिसचे उपचार घेणारे रुग्ण आहेत. 
 
 कल्याण पूर्वेतील ३ रुग्णांपैकी ४४ वर्षीय पुरुषाला १५ एप्रिल रोजी मुंबई येथे ॲडमिट करून २१ एप्रिलला  डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबई येथे पोलीस खात्यात काम करणाऱ्या ३६ वर्षीय पुरुषाचा आणि शासकीय रुग्णालयात परिचारिकेचे काम करणाऱ्या ५७ वर्षीय  महिलेचा यामध्ये समावेश आहे. तर डोंबिवली पश्चिम येथील ३७ वर्षीय पुरुष आणि आंबिवली पश्चिम येथील ३७ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झाली असून हे दोघे ठाणे येथील एका कंपनीत काम करणाऱ्या रुग्णाशी सहवासीत आहेत.  आजच्या या १२ रुग्णांमुळे महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या ९७ झाली असून यापैकी ३ मृत, ३३ डिस्चार्ज तर ६१ रुग्ण हे उपचार घेत आहेत. यापैकी  २९  रुग्ण निऑन हॉस्पिटल येथे आणि शास्त्रीनगर रुग्णालय डोंबिवली येथे  ११ रुग्ण उपचार घेत असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  उर्वरीत रुग्ण हे मुंबई येथे विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.