कल्याण डोंबिवलीत आज ६ नवीन रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा ११४ वर

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात आज कोरोनाचे ६ नवीन रुग्ण आढळले असून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ११४ झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना विषाणूचा

 कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात आज कोरोनाचे ६ नवीन रुग्ण आढळले असून कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ११४ झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आढळलेल्या ६ रुग्णांमध्ये  डोंबिवली पूर्वेतील २० वर्षीय पुरुष,  कल्याण पश्चिमेतील २६ वर्षीय महिला, डोंबिवली पश्चिमेतील ४५ वर्षीय महिला आणि १० वर्षीय मुलाचा समावेश असून हे चौघे कोरोना बाधित रुग्णाचे  निकट सहवासीत आहेत. तर डोंबिवली पश्चिमेतील ३८ वर्षीय महिला हि मुंबई येथील खाजगी रुग्‍णालयात डायलीसिस टेक्निशियन आहे. मोहने आंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या ४२ वर्षीय मुंबई येथील पोलीस कॉन्‍स्‍टेबलला देखील कोरोनाची लागण लागण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण ११४ असून या रुग्णांपैकी ३ जण मयत तर ३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण ७६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्यावतीने देण्यात आली.