केडीएमसीची आचार्य अत्रे रंगमंदिर व सावित्रीबाई फुले रंगमंदिर नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून खुली होणार

कल्याण मधील महापालिकेचे आचार्य अत्रे रंग मंदीर व डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर ही दोन्ही नाट्यगृह 22 ऑक्टोम्बर पासून सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या सुचणेनुसार केवळ 50 टक्के क्षमतेने हे नाट्यगृह सुरू केले जाणार आहे .या दोन्ही नाट्यगृहांमध्ये महापालिका प्रशासनाकडून साफसफाई निर्जंतुकीकरण ,देखभाल दुरुस्तीचे काम ,युद्धपातळीवर सुरू आहे.

    कोरोनामुळे बंद असलेल्या नाट्यगृहाचे दरवाजे उघडण्याची प्रेक्षक आणि कलाकारांना प्रतीक्षा होती .मात्र राज्य शासनाकडून परवानगी मिळत नसल्याने नाट्यगृह सुरु होत नसल्याची खंत होती .कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने 22 ऑक्टोम्बर पासून नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी दिली आहे.या पार्श्वभूमीवर नाट्यगृहाची दारे शुक्रवार पासून उघडणार आहेत.

    कल्याण मधील महापालिकेचे आचार्य अत्रे रंग मंदीर व डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले रंगमंदिर ही दोन्ही नाट्यगृह 22 ऑक्टोम्बर पासून सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या सुचणेनुसार केवळ 50 टक्के क्षमतेने हे नाट्यगृह सुरू केले जाणार आहे. या दोन्ही नाट्यगृहांमध्ये महापालिका प्रशासनाकडून साफसफाई निर्जंतुकीकरण ,देखभाल दुरुस्तीचे काम ,युद्धपातळीवर सुरू आहे.

    शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांच्या “एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात रंगणार आहे. दीड वर्षानंतर सुरु होणार्या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी पालिका प्रशासनाकडून तयारीची लगबग सुरु असून करोना नंतरच्या पहिल्या प्रयोगाचा मान डोंबिवली शहराला मिळणार आहे. या नाटकाच्या तिकीटाची विक्री सुरु झाली असून या तिकीट विक्रीला देखील उदंड प्रतिसाद मिळाल्याचे नाट्यगृह प्रशासनाकडून सांगण्यात आले