नशाबाजांविरोधात कोपरखैरणेकर एकवटले; नवी मुंबईत नशा विरोधी जनजागृती, प्रबोधन व रॅली

गेल्या काही वर्षांमध्ये अनेकजण व्यसनाच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. दारू, गुटखा तंबाखू हे व्यसन आत्ताचा सर्वसामान्य झाले की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष करून तरुण मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे व्यसन करीत आहेत. इतकेच नाही तर आता अमली पदार्थाच्या सेवनामुळे कित्येक जण गुरफटले आहेत. चरस , गांजा, अफिम गर्दा, व्हाइटनर यासारख्या अनेक प्रकारच्या नशा युवक करीत आहे. उच्चभ्रू सोसायटीतील मुलांच्या ठिक ठिकाणी रेव्ह पार्ट्या सुरू असतात.

  नवी मुंबई :  तरुण पिढीतील अनेक जण वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी जाऊ लागले आहेत. त्यामुळे देशाचे भवितव्य एक प्रकारे चक्रव्यूहात सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील कोपरखैरणे मधील नागरिकांनी एकत्र येऊन नशा विरोधामध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला व्यसना विरोधामध्ये नवी मुंबईकरांनी एक प्रकारे  सीमोल्लंघन करून व्यसनमुक्तीचा नारा दिला. यावेळी विभागातील तरुण, महिला व सर्वपक्षीय राजकारणी देखील दंडाला काळ्या फिती बांधून उपस्थित होते.

  गेल्या काही वर्षांमध्ये अनेकजण व्यसनाच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. दारू, गुटखा तंबाखू हे व्यसन आत्ताचा सर्वसामान्य झाले की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे. विशेष करून तरुण मोठ्या प्रमाणात अशाप्रकारे व्यसन करीत आहेत. इतकेच नाही तर आता अमली पदार्थाच्या सेवनामुळे कित्येक जण गुरफटले आहेत. चरस , गांजा, अफिम गर्दा, व्हाइटनर यासारख्या अनेक प्रकारच्या नशा युवक करीत आहे. उच्चभ्रू सोसायटीतील मुलांच्या ठिक ठिकाणी रेव्ह पार्ट्या सुरू असतात.

  काही दिवसांपूर्वी क्रूज वर एनसीबी ने जी धाड टाकली. त्यामुळे शाहरुख खान यांच्यासारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा  मुलगा त्या ठिकाणी आढळून आला. त्याचबरोबर धनदांडग्यांची मुलं अशा प्रकारे  व्यसनाच्या जाळ्यामध्ये अडकली जात आहेत. याशिवाय सर्वसामान्य आणि अल्प उत्पादन गटातील तरुण सुद्धा गांजा चरस गर्दाच्या आहारी गेले आहेत. उद्यानात याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी हे अशा प्रकारची नशा करताना आढळून येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य महिला, युवती यांना त्या ठिकाणी वावरता  येत नाही.

  भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. अनेकदा अशा प्रकारच्या नशा करून वाद आणि भांडणं होतात. त्याचे पर्यावसन हाणामारीत सुद्धा अनेकदा होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होतो. आणि अंतर्गत शांतता भंग होते. आरोग्यदायी व्यसनमुक्त समाज याठिकाणी निर्माण व्हावा.

  आपल्या परिसरात शहरात शांतता नांदावी या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे परिसरातील विविध राजकीय, सामाजिक संघटना आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन नशा मुक्त अभियान हाती घेतले आहे. याअंतर्गत गुरुवारी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. हातात फलक घेऊन वेगवेगळ्या घोषवाक्यांचा माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली. या मोहिमेला कोपरखैरणेकरांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  व्यसन म्हणजे काय तर एखाद्या पदार्थाचे सेवन आणि प्राशन कायम कायम करणे होय. त्याचा शरीरावर दूरगामी परिणाम होतो. व्यसनाच्या मर्यादा आणखी वाढल्या आहेत. त्यामध्ये ब्राऊन शुगर,गर्दी, बटन, चरस ,गांजा, व्हाइटनरची नशा केवळ युवकच नाहीतर युवती सुद्धा अग्रेसर आहेत. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकलेली आहे. त्या चक्रव्यूहातून त्यांना बाहेर काढणे हे समाजासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. व्यसन मुक्ती करण्यासाठी प्रभावी स्वरूपामध्ये प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आम्ही नशा मुक्त कोपरखैरणेचा नारा देऊन जनजागृती केली.

  माऊली बर्वे, रहिवासी कोपरखैरणे

  विभागामध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आम्ही १४ तारखेला जनजागृती केली. नागरिक, तरुण व सर्वपक्षीय यात सहभागी झाले होते. नागरिकांना आवाहन केले आहे की, असं जर कोणी आढळल्यास त्वरित आम्हाला किंवा पोलिसांना कळवा.

  मधुकर राऊत विभागप्रमुख, कोपरखैरणे शिवसेना

  कोपरखैरणेत नशा करणाऱ्या व्यसनाधीन मुलांचे प्रमाण वाढले आहे. गटातटात ही मुले बसलेली असतात. भीतीपोटी नागरिक त्यांची तक्रार करत नाहीत. कोपरखैरणे विभागात रात्रीच्या वेळी रिक्षात ही मुले बसलेली असतात. पोलिसांना वारंवार पेट्रोलींग वाढवण्यास सांगितलेले आहे. आम्ही नागरिकांना देखील आवाहन केले आहे की असे कोणी दिसल्यास आम्हाला कळवा. या रॅलीने बराच फरक पडला आहे मात्र आम्हाला नागरिकांची व पोलिसांची साथ हवी आहे.

  सायली शिंदे माजी नगरसेविका, कोपरखैरणे