ऐरोलीत गणेश नाईक यांच्या आमदार निधीतुन स्वतंत्र ऑक्सिजन प्लान्टचा शुभारंभ; 200 ते 205 रूग्णांना फायदा होणार 

ऐरोली सेक्टर 3 येथील नवी मुंबई पालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात  ऑक्सिजन प्लॅन्टचे उदघाटन आ. गणेश नाईक यांच्याहस्ते पार पडले. ऐरोली, दिघा, रबाळे नोड, गाव गावठाण, झोपडपटटी  परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना यापूढे फायदा होणार आहे. या ऑक्सिजन प्लॅन्टसाठी आ. गणेश नाईक यांनी एक कोटी आमदार निधी दिला होता(Launch of Independent Oxygen Plant in Airoli with MLA funds from Ganesh Naik; 200 to 250 patients will benefit).

  नवी मुंबई : ऐरोली सेक्टर 3 येथील नवी मुंबई पालिकेच्या राजमाता जिजाऊ रूग्णालयात  ऑक्सिजन प्लॅन्टचे उदघाटन आ. गणेश नाईक यांच्याहस्ते पार पडले. ऐरोली, दिघा, रबाळे नोड, गाव गावठाण, झोपडपटटी  परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना यापूढे फायदा होणार आहे. या ऑक्सिजन प्लॅन्टसाठी आ. गणेश नाईक यांनी एक कोटी आमदार निधी दिला होता(Launch of Independent Oxygen Plant in Airoli with MLA funds from Ganesh Naik; 200 to 250 patients will benefit).

  राजमाता जिजाऊ रूग्णालय आता ऑक्सिजन पुरवठयात स्वयंपूर्ण बनले आहे. केवळ कोविड काळातच नव्हे तर कायम ऑक्सिजन पुरवठयाची  सुविधा नवी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी मुंबईत ऑक्सिजनची कमतरता भासली होती. त्यावेळी पालिकेला खासगी कम्पन्यांवर अवलंबून राहावे लागले होते. अगदी आपल्या वाट्याचा प्राणवायू कोणती दुसरी पालिका चोरून तर नेणार नाही ना यासाठी रात्रभर पालिकेचे अधिकारी राखवलदारी करत होते. त्यावेळी पालिकेन्स स्वतःचा प्लॅन्ट उभारून स्वावलंबी होण्यासाठी पाऊल उचलले. त्यानुसार आ. गणेश नाईक यांनी ऐरोली रुग्णालयात प्लॅन्ट उभारण्यासाठी एक कोटी आमदार निधी दिला होता. त्यानुसार पालिकेने आमदार निधी व स्वतःच्या निधीचा वापर करत
  पीएसए तंत्रज्ञानावर आधारित 1000 एलपीएम क्षमतेचा हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.

  कोरोना नियमांचे काटेकोर पालन करीत पार पडलेल्या या कार्यक्रमास  ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभापती अनंत सुतार, माजी सभागृहनेते रविंद्र इथापे, माजी विरोधीपक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ,  माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी परिवहन समिती सभापती अॅड. जब्बार खान, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे आदी मान्यवर उपस्थित होते.

  प्रतिदिन 200 ते 205 रूग्णांना फायदा

  दररोज 200 जम्बो सिलेंडर भरता येतील एवढी ऑक्सिजन निर्मिती या प्लांटमधून होणार असून प्रतिदिन 200 ते 205 रूग्णांना  वैद्यकीय प्राणवायू पुरविता येणार आहे. राजमाता जिजाऊ रूग्णालयात 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या  अतिदक्षता विभागातील रूग्णांना या प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. ऐरोली, रबाळे, दिघा आणि परिसरातील सर्वसामान्य रूग्णांची वैद्यकीय ऑक्सिजनसाठी होणारी धावाधाव थांबणार आहे.

  ऑक्सिजन प्लान्टची वैशिष्ट्ये

  •  तंत्रज्ञान पीएसए
  • क्षमता  1000 एलपीएम
  • 200-205 रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा
  • प्रतिदिन 1.86 टन ऑक्सिजनची निर्मिती
  •  ऑक्सिजन प्लांटकरीता स्वतंत्र 500 केव्हिए क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था
  • एकुण प्रकल्पखर्च 1 कोटी 34 लाख 97 हजार 344 रूपये
  • ऑक्सिजन पुरवठा दारांपेक्षा कमी दरात ऑक्सिजननिर्मिती

  नवी मुंबईत 30 ते 40 वर रोडावलेले कोरोनाची आकडे आज दररोज सरासरी दोन हजारांपर्यत गेले आहेत. राज्यातही कोरोनाची दररोजची संख्या 30 ते 40 हजारांच्या घरात आहे. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पहाता ऑक्सिजनची मागणी वाढली तर जिजाऊ रूग्णालयातील या प्रकल्पामधून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. याशिवाय खाजगी रूग्णालयांनाही या प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. कोरोना विरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. महापालिका आयुक्त आणि अनेक अधिकारी प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत मात्र काही अधिकाऱ्यांमध्ये सुधार घडविण्याची गरज आहे

  आमदार गणेश नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्र
  हे सुद्धा वाचा
  • 2022