
कोपरखैरणे विभागातील एलबीटी विभागातील (LBT Officer Arrested In Bribe Case)लिपिकास ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या घटनेने नवी मुंबई पालिका(Corruption In Navi Mumbai) अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या(NMMC) बेलापूर विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Navi Mumbai Anti Corruption Bureau) अटक केली असतानाच आज कोपरखैरणे विभागातील एलबीटी विभागातील (LBT Officer Arrested In Bribe Case)लिपिकास ३ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या घटनेने नवी मुंबई पालिका अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराची खैरणे एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनी आहे. तक्रारदाराने त्यांच्या खाजगी कंपनीस सन २०१३ ते २०१६ या कालावधीत आलेला सेस कर नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयास सन २०१९ साली भरला आहे. सन २०१३ ते सन २०१६ या कालावधीतील सेस कर वेळेत न भरल्यामुळे त्यावर दंडाची रक्कम व व्याजाची रक्कम कोपरखैरणे सेस /एलबीटी विभागातील कार्यालयीन संगणकामध्ये निरंक दाखविण्यासाठी विभाग कार्यालयातील कंत्राटी कामगार असलेले लिपिक विनायक पाटील हे रुपये ३ लाख रुपये लाचेच्या रकमेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे नोंदवली होती. ८ तारखेला शासकीय पंचांसमक्ष लाचेच्या मागणीच्या सत्यता पडताळणी दरम्यान, तक्रारदार यांच्या कंपनीचे नावे कराची दंडाची व व्याजाची रक्कम निरंक दाखविण्यासाठी पालिकेचे लिपिक विनायक पाटील यांनी तक्रार यांच्याकडे तीन लाखांची मागणी करून १ लाखांची रक्कम स्वीकारण्याचे कबूल केले.
त्यानंतर काही वेळाने केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान लिपिक विनायक पाटील यांनी बिकानेर स्वीट मार्टसमोर दिवाळे गाव सीबीडी बेलापुर नवी मुंबई येथे तक्रारदार यांच्या गाडीमध्ये तक्रार यांच्याकडून रुपये एक लाख लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना दुपारी पाऊण वाजता रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
महिनाभराच्या अंतरात पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून अधिकाऱ्यांकडून वाढलेली हफ्तेखोरी व त्यामुळे कंटाळलेले नागरिक हे आता थेट लाचलुचपत विभागाकडे बेधडक तक्रार करू लागल्याने पालिका अधिकारी व त्यांचे हफ्ते वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बोबडी वळली आहे.
या सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख, पोहवालदार जाधव, पोहवालदार पवार, पोना ताम्हणेकर, पोना पांचाळ,पोशीपाई माने, चापोहवालदार गायकवाड सहभागी झाले होते.