उल्हासनगरमध्ये भरदिवसा 5 गुंडांनी केली तरुणाची हत्या घटनेचा LIVE VIDEO

उल्हासनगरमधील कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या कऱण्यात आली.

    उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस वाढत चालेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे परिसर हादरून गेला आहे. आज पुन्हा एकदा उल्हासनगर कॅम्प 4 च्या नेताजी चौक बंगलो परिसरात एका तरुणाची पाच जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर निर्घृणपणे हत्या केली आहे. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

    उल्हासनगरमधील कॅम्प 4 मधील नेताजी चौक बंगलो परिसरात दुपारच्या सुमारास ही थरारक घटना घडली. सुशांत गायकवाड असं मृत तरुणाचं नाव आहे. पाच जणांच्या टोळीने सुशांतची हत्या केली. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी चाकू, तलवारी आणि लोखंडी रॉडने सपासप वार करून ही हत्या कऱण्यात आली.

    हत्या करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, ही हत्या गुंड आकाश शिंदे उर्फ चिंट्या आणि त्याचे साथीदार अमोल मोरे उर्फ वांग्या, आकाश खडसे, अवी थोरात आणि यश रुपवते यांना केली असून पोलिसांनी त्यांहा अटक केली आहे. या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल असून या आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात बेडया ठोकल्या आहेत.

    दरम्यान, पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे.