नवी मुंबई : तुर्भे गोदामाला लागलेल्या आगीत ४५ BMW गाड्या जळून खाक

वाशी, तुर्भे एमआयडीसी (Vashi, Turbhe) आणि नेरुळ (Nerul) येथील अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे सहा तास आग विझवण्याचे काम सुरू होते.

    नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी (Turbhe MIDC) परिसरातील लक्झरी कार कंपनीच्या गोदामाला मंगळवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत तब्बल ४५ बीएमडब्ल्यू (45 BMW) गाड्या जळून खाक झाल्या.

    वाशी, तुर्भे एमआयडीसी (Vashi, Turbhe) आणि नेरुळ (Nerul) येथील अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुमारे सहा तास आग विझवण्याचे काम सुरू होते.

    मात्र, गोदामात उभ्या असलेल्या ४५ बीएमडब्ल्यू गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या.

    प्रथमदर्शनी आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे, अशी माहिती वाशी अग्निशमन केंद्रातील अधिकाऱ्याने दिली.

    या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तुर्भे पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली असून जागेचा पंचनामा करण्यात आला आहे.