महाराष्ट्र बंद; ठाण्यात १७७ आंदोलकांवर कारवाई

लखीमपूर उत्तर प्रदेश येथे शेतकरी आंदोलकांबाबत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना , राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष , रिपाई एकतावादी व इतर पक्ष संघटना यांनी आज महाराष्ट्र बंदची(Maharashtra bandh) हाक दिली होती . त्या दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये एकुण ४० ठिकाणी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली.

    ठाणे : लखीमपूर उत्तर प्रदेश येथे शेतकरी आंदोलकांबाबत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना , राष्ट्रीय काँग्रेस , राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष , रिपाई एकतावादी व इतर पक्ष संघटना यांनी आज महाराष्ट्र बंदची(Maharashtra bandh) हाक दिली होती . त्या दरम्यान ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये एकुण ४० ठिकाणी विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली.

    त्यामध्ये नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीत ५ ते ६ इसमांनी ज्ञानसाधना कॉलेज समोरील मुंबई नाशिक महामार्गावर रास्ता रोखो करण्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केल्याने त्यांचावर कलम १८८ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १ ) ( ३ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

    तसेच ठाणेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये टेंभीनाका आनंद आश्रम समोर काही इसमांनी रिक्षा आडवून बंद पाळण्याबाबत सांगितल्याने त्यांच्याविरुध्द कलम १४३ , १८८ , ५०६ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ ( १ ) ( ३ ) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. दिवसभरात १७७ आंदोलकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ / ६ ९ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून अपवादात्मक घटना वगळता ठाण्यात बंद पुर्णपणे शांततेत पार पडला.