MNS Toll Naka Todfod

अनेक वर्षांपासून भिवंडी अंजुर फाटा ते वसई कामण चिंचोटी पर्यंतचे रस्ते अतिशय खराब, निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेकदा निवेदने देऊनसुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी निवेदनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनसेचा खळखट्याक आंदोलन करण्यात आले

    मुंबई : भिवंडी तालुक्यातील मालोडी टोलनाका मनसेने फोडला आहे. अनेक वर्षांपासून भिवंडी अंजुर फाटा ते वसई कामण चिंचोटी पर्यंतचे रस्ते अतिशय खराब, निकृष्ट दर्जाचे असून या रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. अनेकदा निवेदने देऊनसुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी निवेदनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मनसेचा खळखट्याक आंदोलन करण्यात आले

    याआधी मनसेने रस्ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल बंद ठेवण्याचा इशारा दिला होता तर कालच मनसेने मालोडी टोल नाका बंद पडला होता मात्र या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा टोल सुरू झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनी टोल नाक्याची तोडफोड केली आहे.