
ठाण्यामध्ये(Thane Crime)अभिरुची हॉटेलमध्ये(Abhiruchi Hotel) चिकन लॉलीपॉपची ऑर्डर हॉटेल बाहेर प्लेटमध्ये न दिल्याने संतप्त तरुणाने हॉटेल मालकावर(Attack On Hotel Owner) सपासप वार केले आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हल्लेखोराने अवघ्या १४ सेकंदांमध्ये हॉटेल मालकावर २४ वार केले आहेत.
रागाच्या आणि नशेच्या भरात आजकाल माणसं काहीही करत असतात. सध्या ठाण्यामध्ये(Thane Crime) अशीच एक भयानक घटना घडली आहे.कॅसल मिल परिसरातील अभिरुची हॉटेलमध्ये(Abhiruchi Hotel) एका माणसाने जेवणाची प्लेट बाहेर आणून न दिल्याने हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला(Attack On Hotel Owner) केला आहे.
अभिरुची हॉटेलमध्ये चिकन लॉलीपॉपची ऑर्डर हॉटेल बाहेर प्लेटमध्ये न दिल्याने संतप्त तरुणाने हॉटेल मालकावर सपासप वार केले आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हल्लेखोराने अवघ्या १४ सेकंदांमध्ये हॉटेल मालकावर २४ वार केले आहेत. या हल्ल्यात हॉटेल मालक प्रशांत पुजारी जखमी झाले आहेत. हल्लेखोर अशोक मरसाळे याचा शोध सुरु असल्याचे राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी सांगितले. या घटनेमुळे हॉटेल मालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.