woman got free from home

बल्याणी(‌Balyani) परिसरातील माताजी मंदिर टेकडी परिसरात चाळीत राहणाऱ्या जमशेद गनी हा आपली पत्नी शगुप्ता व २० माहिनांच्या चिमुकलीसह राहत असुन तो बेरोजगार होता. जमशेद गनी हा घराबाहेर जाताना आपल्या पत्नीस घराच्या दरवाजाला कुलूप लावुन(Woman Got Freedom On Vatpournima) पत्नी व मुलीस कोंडुन निघून जायचा.

    दत्ता बाठे, कल्याण : वटपौर्णिमाच्या(Vatpournima) दिवशी नवऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळलेल्या सावित्रीची(Women got Freedom From Husband`s torture) बल्याणी येथुन शिवसैनिकांनी(Shivsena Workers) पोलिसांच्या मदतीने सुटका करीत तिला वडील व भाऊ यांच्याकडे सोपविले आहे.

    बल्याणी परिसरातील माताजी मंदिर टेकडी परिसरात चाळीत राहणाऱ्या जमशेद गनी हा आपली पत्नी शगुप्ता व २० माहिनांच्या चिमुकलीसह राहत असुन तो बेरोजगार होता. जमशेद गनी हा घराबाहेर जाताना आपल्या पत्नीस घराच्या दरवाजाला कुलूप लावुन पत्नी व मुलीस कोंडुन निघून जायचा. तिला मानसिक त्रास देत होता. याबाबत गोरेगाव येथे राहणारे तिचे वडील व भाऊ यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कानावर हा प्रकार आला असता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याशी संपर्क साधला.

    शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेना उपशहर प्रमुख किशोर शुक्ला यांना शगुप्ता हिस मदत करून नवऱ्याचा मानसिक त्रासातून सुटका करावी,असे सांगितले. किशोर शुक्ला यांनी युवासेना पदाधिकारी जयेश वाणी, शिवसेना पदाधिकारी दादा किस्मतराव, संतोष पवार यांनी टिटवाळा पोलीसच्या सह शगुप्ता यांचे घर शोधुन कुलुपबंद असलेल्या चाळीतील घरातून घराचे टाळे तोडून शगुप्ता व तिच्या चिमुकलीची सुटक केली.

    शगुफ्ताचा शोध घेऊन खरी परिस्थिती माहित झाल्यावर टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु वंजारी यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. वंजारी यांनीही प्रशासनाची चाकं वेगाने फिरवून पोलीस हवालदार संदिप मुंडे, पोलीस हवालदार शरद आव्हाड, महिला पोलीस हवालदार ज्योत्स्ना पडवळ यांची एक टिम या महिलेच्या आणि तिच्या लहान बाळाच्या सुटकेसाठी पाठवली.

    घराचं कुलूप तोडून पोलीस आणि शिवसैनिकांनी या महिलेची आणि तिच्या बाळाची सुटका केली. झाल्या प्रकारानंतर पीडित महिलेने शिवसेना आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. मी मुस्लिम असुनही आज मला माझ्या शिवसेनेच्या भावांनी मदत केल्याची भावना तिने व्यक्त केली. वटपौर्णिमेला एका सावित्रीची पतीच्या जाचातून मुक्तता करण्यात येऊन तिच्या इच्छेनुसार तिला तिच्या आई – वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं.