Matoshri connection in Thane Covid Center scam; BJP leader Kirit Somaiya's sensational

कल्याण- डोंबिवलीनंतर ठाण्यातही कोविड सेंटर उभारणीतील घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. फक्त कंत्राटदारांसाठी हे सेंटर उभारण्यात आले. या कंत्राटांचे मातोश्रीशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी उध्दव ठाकरे तसेच सरकारवर निशाणा साधला असून ,या सर्व व्यवहारांची काळी पत्रिका जारी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

ठाणे : कल्याण- डोंबिवलीनंतर ठाण्यातही कोविड सेंटर उभारणीतील घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. फक्त कंत्राटदारांसाठी हे सेंटर उभारण्यात आले. या कंत्राटांचे मातोश्रीशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्यांनी उध्दव ठाकरे तसेच सरकारवर निशाणा साधला असून ,या सर्व व्यवहारांची काळी पत्रिका जारी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

कोरोना रुग्णांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी ठाणे महापालिकेने कोविड सेंटर उभारली असून यातील व्होल्टास येथे नव्याने काम सुरु आहे तर बोरिवडे आणि ग्लोबल हॉस्पिटल ही कोविड सेंटर अद्यावत सुरु आहेत. या सेंटरची क्षमता १ हजार ८७५ असताना रुग्णसंख्या मात्र अवघी २५२ आहे. या तीन कोविड सेंटरची सोमय्यानी पाहणी केली.याप्रसंगी सोमय्यासोबत आमदार निरंजन डावखरे ,भाजप गटनेते संजय वाघुले व महा पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.

यावेळी सोमय्या यांनी ठाण्यातील कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावरून आपल्या पसंतीच्या कॉन्ट्रॅक्टरला ५२ कोटीचे कॉट्रॅक बक्षीस म्हणून दिले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. हा जवळपास कोविड सेंटरचा घोटाळा ५ हजार कोटींचा असल्याचे सोमय्या म्हणाले.