jitendra awhad

म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणी भाजपा आक्रमक झाला असून परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले(MHADA exam paper leak: protest outside Jitendra Awhad's house; Akhil Bharatiya Vidyarthi Parishad and NCP workers clashed).

    ठाणे : म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणी भाजपा आक्रमक झाला असून परीक्षा रद्द झाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर सोमवारी निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपापसात भिडले(MHADA exam paper leak: protest outside Jitendra Awhad’s house; Akhil Bharatiya Vidyarthi Parishad and NCP workers clashed).

    राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्याता आला. आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ बंगल्याबाहेर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि हाणामारी झाली.

    यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही तणाव निर्माण झाला होता.आव्हाड पोलिसांच्या मदतीने दडपशाही करत असल्याचा आरोप अभाविपने केला.