कल्याण डोंबिवलीतील बाराशे कामगार विशेष ट्रेनने बिहारला रवाना

कल्याण : लॉकडाऊन काळात कल्याण डोंबिवलीमध्ये अडकलेल्या सुमारे बाराशे मजुरांना घेऊन कल्याणहुन विशेष ट्रेन बिहार येथे रवाना झाली. कल्याण रेल्वे स्थानकातून ही विशेष गाडी सोडण्यात आली. लॉकडाऊनमुळे अडकून

कल्याण : लॉकडाऊन काळात कल्याण डोंबिवलीमध्ये अडकलेल्या सुमारे बाराशे मजुरांना घेऊन कल्याणहुन विशेष ट्रेन बिहार येथे रवाना झाली. कल्याण रेल्वे स्थानकातून ही विशेष गाडी सोडण्यात आली. लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या आणि अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गावी जाण्यासाठी निघालेल्या या मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सरकारकडून परप्रांतीय मजुरांना गावी पाठवण्यासाठी ट्रेन बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता असल्याने काही मजूर उत्तर प्रदेशला सायकलवरुन निघाले आहेत तर कुणी चक्क पायीच गावी जाण्यासाठी निघाले आहेत.