नवी मुंबईच्या अर्थसंकल्पातून पूर्ण होणार आमदारांचे नागरी प्रकल्प, बेलापूर भागासाठी १००० कोटी अपेक्षित

नवी मुंबई पालिकेच्या (Navi Mumbai) इतर विकास कामांसोबत बेलापूर (Belapur) विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी अनेक प्रकल्प नवी मुंबईत आणले आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात आकारास येण्यासाठी १००० कोटी (1000 Crore For Belapur Area) रुपयांची गरज भासणार आहे.

  नवी मुंबई : शहरातील अर्थसंकल्प (NMMC Budget)  काही दिवसांत जाहीर होणार आहे. कोविडचे संकट दूर होत असताना या अर्थसंकल्पाला महत्व प्राप्त झाले आहे. कोविडमुळे गेली दोन वर्षे विकासावर निर्बंध आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यात पालिकेच्या इतर विकास कामांसोबत बेलापूर (Belapur) विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे (MLA Manda Mhatre) यांनी अनेक प्रकल्प नवी मुंबईत आणले आहेत. त्यासाठी पाठपुरावा केला आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात आकारास येण्यासाठी १००० कोटी रुपयांची गरज भासणार आहे. यात सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा (SuperSpeciality Hospital) प्रकल्प देखील असून हे प्रकल्प आकारास आल्यास बेलापूरसह संपूर्ण नवी मुंबईकरांना त्याचा लाभ घेता येणार असून शहराचे महत्व वाढणार आहे.

  नवी मुंबई महानगरपालिकेचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. बेलापूर मतदारसंघामध्ये सक्षम पायाभूत
  सुविधा उपलब्ध होण्यासोबत प्रलंबित विकासकामांकरिता अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रात सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज उभारणे, महिला सक्षमीकरण करिता महिला भवन, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा याकरिता बाल भवन उभारणे, सानपाडा येथील नियोजित सेन्ट्रल लायब्ररी, सीवूड्स येथील ज्येष्ठ नागरिकांकरिता आकारास येणारे ओल्ड एज होम व त्यातील मधील फर्निचर व तत्सम समान खरेदी, ज्वेल ऑफ नवी मुंबई नेरूळ येथे ३० फुट उंच ब्रांझ धातूचा गौतम बुद्ध पुतळा उभारणे,  आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याकरिता शुटींग रेंज प्रशिक्षण,  मॅटवरील कुस्तीचा आखाडा उभारणे, भविष्यात पाण्याची कमतरता भासू नये याकरिता मोरबे धरणाची खोली व  उंची वाढवणे, नेरूळ महात्मा गांधी नगर येथील मुलांना शालेय शिक्षण मिळावे याकरिता बालवाडीची उभारणी, बेलापूर मतदारसंघात सोलर पार्क उभारणे, प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी रु. ५ लाखांपर्यंत शिष्यवृत्ती देणे, सामाजिक सेवा भूखंड हस्तांतरित करून तेथे शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे, पर्यावरण ग्रील हाउस उभारणे, ज्येष्ठ नागरिक निवासी केंद्र उभारणे, प्रकल्पग्रस्त तरुण-तरुणींना स्वयंरोजगार केंद्र उभारणे, नेरूळ
  वंडर्सपार्कमध्ये सायन्स सेंटर उभारणे, आपत्कालीन व्यवस्थेमध्ये नागरिकांना राहण्यासाठी संक्रमण शिबिरे उभारणे, तुर्भे रेल्वे स्टेशनजवळ उड्डाणपूल उभारणे अशी अनेक विकास कामे प्रलंबित आहेत.

  बेलापूर विधानसभा क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले गेल्याने या भागाला महत्व आहे. त्यात नागरिकांच्या सुविधांसाठी मी अनेक प्रकल्पांसाठी पाठपुरावा करून आणले आहेत. त्यासाठी भूखंड उपलब्ध करून घेतले आहेत. पालिकेने ही कामे पूर्ण करावीत. त्यासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी. हे प्रकल्प आकारास आल्यास नवी मुंबई शहर अनेक बाबतीत अधिक नावाजले जाईल.

  - आ. मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर विधानसभा क्षेत्र

  सदर कामे मार्गी लागावे, याकरिता येत्या २०२२-२३ अर्थसंकल्पात रु.१००० कोटींची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. ही सर्व कामे झाल्यास बेलापूर मतदारसंघाच्या विकासात भर पडणार आहे.

  आमदार मंदा म्हात्रे यांनी अनेक नवनवे प्रकल्प बेलापूर मतदारसंघात आणले आहेत. त्यासाठी भूखंडांची मागणी करून सातत्याने सिडकोकडे पत्रव्यवहार व कोविड असतानाही बैठका घेत पाठपुरावा केला आहे. त्यामुळे नवनवीन कल्पना आणून त्या सत्यात उतरवण्यात मंदा म्हात्रे यशस्वी ठरल्या आहेत. आ. म्हात्रे यांनी प्रयत्न करून आणलेले हे सर्व उपक्रम पालिकेने पूर्ण करणे गरजेचे आहे. नवी मुंबई पालिका जरी नागरिकांना सुविधा देण्याचे कार्य करत असली तरी अद्यापही शहराला खऱ्या अर्थाने आधुनिकता आणणे गरजेचे आहे. आ. मंदा म्हात्रे यांनी आणलेल्या कल्पना पूर्ण केल्यास बेलापूरसह नवी मुंबईकरणण्या सुविधांचा उपयोग होणार आहे. नवी मुंबईला अनेक बाबतीत स्वयंपूर्णतः लाभणार आहे. तर दुसरीकडे पर्यटन वाढीस मदत मिळणार आहे. यासह सुपरस्पेशालिटी    रुग्णालयामुळे कोविड सारख्या संकटात खासगी रुग्णालयांवर अवलंबून न राहता; स्वावलंबी होऊन करदात्यांना मोफत व कमी खर्चात उपचार उपलब्ध करून देता येणार आहेत.