३१ डिसेंबर रोजीची संचारबंदी शिथिल करावी-मनसेची मागणी ; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मनसैनिक उतरणार रस्त्यावर

ठाणे : राज्य शासनाने आणि ठाणे पोलिसांनी ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ नंतर संचारबंदीचे आदेश दिलेले आहेत. सादर संचारबंदीने नव्या वर्षाचे स्वागत जल्लोषात करणे कठीण आहे. तेव्हा ३१ डिसेंबर रोजी रात्री सरकारने संचारबंदी शिथिल करावी अशी मागणी ठाणे मनसेने केलेली आहे. तर मनसैनिक हे मोठ्या प्रमाणात ३१ डिसमेंबर रोजी रस्त्यावर उतरून जल्लोषात नव्या वर्षाचे स्वागत करणार आहेत. यामुळे आता मनसे आणि ठाणे पोलीस आमने -सामने येण्याची चिन्ह आहेत.

इंग्लंडमधील कोरोनामुळे पुन्हा झालेला लॉकडाऊन हा भारतात परवडणारा नाही. तसेच राज्यातील कोरोनाची संख्या काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. तर डोक्यावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आहेत. त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरतील आणि जल्लोष करतील परिणामी कोरोनाचा प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे. सोशल डिस्टन्सचे पालन केल्यास दुसऱ्या लाटेच्या संकटातून बाहेर पडत येईल म्हणून ५ जानेवारी पर्यंत संचारबंदी रात्री ११ नंतर जरी केली असताना मनसे ३१ डिसेंबर रोजी संचारबंदी शिथिल करण्याची मागणी करीत आहे. नागरिकांच्या डोक्यावर नव्या जीवघेण्या व्हायरस कोरोना-२ असताना विचारपूर्वक राज्यात संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र मनसेच्या माध्यमातून मागील एक वर्षांपासून सगळ्याच सणांवर संक्रांत आणलेली आहे. तेव्हा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शिथिलता करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकार शिथिलता न केल्यास मनसैनिक रस्तयावर उतरून नव्या वर्षाचे स्वागत करतील अशी भूमिका मनसेचे अविनाश जाधव यांनी स्पहस्त केली. त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीच मनसैनिक आणि पोलीस यांच्यात संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.