भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये फेरबदल

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुळ मंजूर विकास योजनेचे व सुधारीत मंजूर विकास योजनेचे नकाशे भिन्न स्वरुपाच्या प्रमाणात असल्याने भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीमधील विद्यमान अधिकृत इमारतींवर मंजूर सुधारीत विकास आराखड्यामधील आ.क्र.६२-खेळाचे मैदान या आरक्षणाच्या हद्दीमधील चुक दुरुस्ती करण्याचा फेरबदल प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेने  कार्यान्वीत केला असुन त्यास मान्यता देण्यात आली. 

    मुंबई : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर सुधारित विकास आराखड्यामधील खेळाच्या मैदानावरील आरक्षणाच्या हद्दीमधील चूक दुरुस्ती करण्याच्या फेरबदल प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मंजुर फेरबदल प्रस्तावानुसार आरक्षण क्र. ६२ “खेळाचे मैदान” या आरक्षणामधील विदयमान अधिकृत इमारतीनी व्याप्त क्षेत्र आरक्षणामधून वगळून रहिवास वापर विभागात अंतर्भूत करण्यात आलेले आहे.