खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली पत्रीपुलाच्या कामाची पाहणी

कल्याण : कल्याण येथील पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. परंतु जगभर कोविड १९ च्या वाढत्या

 कल्याण : कल्याण येथील पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. परंतु जगभर कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे २३ मार्च २०२० पासून हे काम ठप्प होते. परंतु दुसऱ्या लॉकडाऊनमधील काही अटी व शर्तीचे पालन करून हे काम सुरु करण्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करून परवानगी मिळवून घेतली असून २ एप्रिल २०२० पासून काही मोजक्या मजुरांद्वारे कल्याण पत्रीपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे.

आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून तेथील ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून कामाचा आढावा घेतला व त्यांना कामासंर्भात योग्य ते निर्देश दिले. तसेच याकामासाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. त्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार पत्री पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने विशेष करून पश्चिम बंगालमधून असे मजूर उपलब्ध केले आहेत. तसेच पुलाच्या स्तंभाचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीच्या गाळाचे लॉचिंग करण्याकरिता आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे तसेच गाळ्याचे कामही हैद्राबाद येथे पूर्ण झाले असून सर्व साहित्य पुढील येत्या १० दिवसांमध्ये प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध होईल व पुढील महिन्यापासून लॉचिंग प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्ट अखेर पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या ठिकाणी तिसऱ्या पत्रीपुलाचे कामही जुलै महिन्यापासून सुरु होत असून त्याचे आवश्यक नकाशे व संकल्पने अंतिम झाले असून प्रत्यक्ष काम जुलै महिन्यामध्ये सुरु करून पुढील १ वर्षाच्या कालावधीत या ही पुलाचे काम पूर्ण होईल व यामुळे कल्याण डोंबिवली मधील नागरिकांना होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी संपेल, असा मानसदेखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.