नवी मुंबई : कोविड योध्यांसाठीच्या सिडको घरांची लॉटरी; १५ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत

सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रीयेद्वारे सदनिका अदा करण्यात येणार आहेत. यात प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचादेखील समावेश करण्यात येणार आहे(Navi Mumbai: CIDCO Home Lottery for Kovid Warriors; Leaving the computer on November 15). 

    नवी मुंबई : सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रीयेद्वारे सदनिका अदा करण्यात येणार आहेत. यात प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचादेखील समावेश करण्यात येणार आहे(Navi Mumbai: CIDCO Home Lottery for Kovid Warriors; Leaving the computer on November 15).

    कोविड महासाथीच्या काळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य व सफाई कर्मचारी, पोलीस आणि अन्य गणवेषधारी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता, समाजाप्रति आपले कर्तव्य बजावत अनेकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या कार्याप्रति कृतज्ञतेची भावना म्हणून सिडकोकडून, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट २०२१ रोजी कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या ५ नोडमध्ये एकूण ४,४८८ घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आली. एकूण घरांपैकी १,०८८ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३,४०० घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत.

    या योजनेकरीता पहिली संगणकीय सोडत २९ ऑक्टोबर २०२१ रोजी काढण्यात आली होती. उपलब्ध घरांसाठी आणि अनामत रकमेचा भरणा केलेल्या परंतु ज्यांना अद्याप घर वाटपित  झालेले नाही अशा सर्व अर्जदारां करीता दुसरी संगणकीय सोडत उपरोक्त तारखेस काढण्यात येणार आहे. दुसऱ्या सोडतीमध्ये अर्जदारांनी ज्या ठिकाणास प्राधान्य दिले आहे त्या पेक्षा वेगळ्या ठिकाणचे घर त्यांना वाटपित केले जाऊ शकते, याची नोंद घेण्यात यावी. सदर सोडत पार पडल्यानंतर वाटपित झालेल्या घरांचा स्वीकार करण्यासाठी अर्जदारांना 15 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सोडतीद्वारे उपलब्ध झालेली सदनिका स्वीकारणे अर्जदारास बंधनकारक असणार नाही. सोडतीनंतर यशस्वी अर्जदारांच्या नावांची यादी https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

    कोट-:सदर विशेष गृहनिर्माण योजनेची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की जरी अर्जदार प्रथम सोडतीत अयशस्वी ठरला तरी प्रत्येक अर्जदाराला उपलब्ध असलेल्या स्थळी सदनिका मिळेल. कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याने ‘प्रत्येक अर्जदारास घर’ या सिडकोने दिलेल्या वचनाची पूर्तता होणार आहे.