NCB आणि समीर वानखेडे हे एकंदरीत गंभीर प्रकरण आहे; योग्य ती पावले टाकली जातील – जयंत पाटील

‘आर्यन खान प्रकरण बोगस असल्याचे नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केले आहे. आज समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते.’ असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

    ठाणे – नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत एनसीबी आणि समीर वानखेडे यांचे प्रकरण समोर आणले असून एकंदरीत हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणी योग्य ती पावले टाकली जातील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ठाणे येथे पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला. मग शेवटी सरकार पडत नाही म्हटल्यावर सरकार व मंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आर्यन खान हे त्यातलंच प्रकरण असल्याचे जयंत पाटील यांनी म्हणाले आहे.

    ‘आर्यन खान प्रकरण बोगस असल्याचे नवाब मलिक यांनी पुराव्यासहीत उघड केले आहे. आज समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र प्रसारीत केले आहे. त्यावरून समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय असल्याचे दाखवून फायदा मिळवला असल्याचे दिसत आहे. प्रभाकर साहील याने एनसीबी व समीर वानखेडे यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे हे सर्व धक्कादायक आहे. मुंबईतील बॉलिवूड आणि महाराष्ट्र बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. ईडी, सीबीआय, आयटी या यंत्रणा कमी पडल्यामुळे आता एनसीबी ॲक्टीव झालेली दिसते.’ असाही आरोप जयंत पाटील यांनी केला.

    दरम्यान, क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात अंतर्गत चौकशी सुरू झाली असुन, वानखेडे यांच्यावर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रगच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी 25 कोटींची लाच मागीतल्याचा आरोप आहे. एनसीबीचे उपमहासंचालक आणि एजन्सीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले की, ते स्वतः वानखेडेविरोधातील तपासावर लक्ष ठेवून आहेत.

    चौकशी सुरू असतानाही समीर वानखेडे आपल्या पदावर कायम राहणार का?, असा प्रश्न ज्ञानेश्वर सिंह यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर ते म्हणाले की, आम्ही नुकताच तपास सुरू केला आहे, त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. सिंग म्हणाले की, एका साक्षीदाराने प्रतिज्ञापत्राद्वारे सोशल मीडियावर काही तथ्ये प्रसारित केली, त्याची दखल घेत, NCB च्या मुख्य संचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती आणि पुराव्यांची शहानीशा करुनच पुढील कारवाई केली जाईल. असं ज्ञानेश्वर सिंह यांनी म्हटलं आहे.