No classes or tuition created with the help of YouTube CA; Tejaswini's stubbornness in Kalyan is unbreakable

आई वडीलाची परिस्थिती गरीबीची पण आई वडीलांनी शिक्षणासाठी दिलेले पाठबळ, त्यांच्या मेहनतीतुन सी ए बनत संधीची सोनं करण्याची किमया कल्याणातील बैठा चाळीत राहणाऱ्या तेजस्विनीने केली आहे. आई वडीलांचे स्वप्न तिने प्रत्यक्षात साकरले आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, ध्येय आणि मेहनत करण्याची तयारी असली तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते हे कल्याणातील एका गरीबीचे चटके सोसत जगणाऱ्या तेजस्विनी सोगम या तरुणीने दाखवून दिले आहे. चार घरची धुणीभांडी करीत संसाराला हातभार लावित कुटुंबाची अर्थिक घडीचा ताळमेळ बसण्यास सतत काबाडकष्ट करणाऱ्या तिच्या आईचे आनंद आश्रू ओघळल्याने आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे दिसले (No classes or tuition created with the help of YouTube CA; Tejaswini's stubbornness in Kalyan is unbreakable ).

  कल्याण : आई वडीलाची परिस्थिती गरीबीची पण आई वडीलांनी शिक्षणासाठी दिलेले पाठबळ, त्यांच्या मेहनतीतुन सी ए बनत संधीची सोनं करण्याची किमया कल्याणातील बैठा चाळीत राहणाऱ्या तेजस्विनीने केली आहे. आई वडीलांचे स्वप्न तिने प्रत्यक्षात साकरले आहे. हे यश प्राप्त करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती, ध्येय आणि मेहनत करण्याची तयारी असली तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते हे कल्याणातील एका गरीबीचे चटके सोसत जगणाऱ्या तेजस्विनी सोगम या तरुणीने दाखवून दिले आहे. चार घरची धुणीभांडी करीत संसाराला हातभार लावित कुटुंबाची अर्थिक घडीचा ताळमेळ बसण्यास सतत काबाडकष्ट करणाऱ्या तिच्या आईचे आनंद आश्रू ओघळल्याने आपल्या कष्टाचे चीज झाल्याचे दिसले (No classes or tuition created with the help of YouTube CA; Tejaswini’s stubbornness in Kalyan is unbreakable ).

  कल्याण पश्चिमेकडील बेतुरकर पाडा परिसरातील शिवाजी नगर येथील बैठ्या पारिजात चाळीत जेमतेम २५० चौरस फुटाच्या बैठ्या खोलीत पत्नी आणि ५ मुलासह राहणारे विकास सोगम कपड्याच्या दुकानात सेल्समनचे काम करून आपल्या संसाराचा गाडा ओढतात. तर पत्नी विश्वाली चार घरची धुणीभांडी करीत संसाराला हातभार लावते. शिक्षणाची प्रचंड आवड असतानाही आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला शिकता आले नाही मात्र आपल्याला कितीही काबाडकष्ट करावे लागले तरी चालतील आपण आपल्या मुलांना शिकवायचेच या ध्येयाने झपाटलेल्या विश्वाली यांनी आपल्या सर्व मुलांना चांगले शिक्षण देण्याचा ध्यास घेतला होता. त्यांची मोठी मुलगी तेजस्विनी सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. यामुळे तिला चांगले शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

  आई वडीलांच्या प्रोत्साहनामुळे गरिबीची चिंता न करता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करत तेजस्विनीने यशाला गवसणी घातली आहे. शिशुविकास शाळेतून १० वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर बिर्ला महाविद्यालयातून तिने पदवी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर सी ए होण्याची जिद्द करत आयसीएआय मध्ये प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाची जवळपास ३७ हजार रुपयाची फी भरण्याचे आव्हान होते मात्र आई ज्यांच्याकडे धुणीभांडी करते त्या रेल्वेतून निवृत्त झालेल्या प्रवीण बिवलकर, राजेश दीक्षित, गोखले काका यासारख्या दानशूर व्यक्तींनी तेजस्विनीच्या हुशारीला आर्थिक मदतीचा हात दिला. फी साठी लागणारी सर्व प्रकारची आर्थिक मदत करत तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. सी एची परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेसची हजारो रुपयाची फी भरणे आवाक्याबाहेर असल्याने तेजस्विनीने युट्युबची मदत घेत अभ्यास सुरु केला.

  दोन टप्प्यात परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालण्यासाठी तिने सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजेपर्यत केवळ अभ्यास करण्यावर भर दिला. वर्षभर स्वताला कोंडून घेत युट्यूबच्या मदतीने तिने आपल्या जीवनातील अंधकार दूर केला आहे. गोल्डन पार्क मध्ये राहणाऱ्या राजेश दीक्षित यांनी त्यांचे रिकामे घर तेजस्विनीला अभ्यासासाठी उघडून दिले. यामुळे तिला कोणतीही व्यत्यय न येता दररोज सुमारे १४ तास अभ्यास करणे सोयीचे होत होते असे तेजस्विनी सांगितले.

  तेजस्वीनिची दुसरी बहिण शेअर मार्केटीगचा अभ्यास करत असून तिसरी बहिण नर्स आहे तर चौथी बहिण पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असून भाऊ यंदा ११ वीत आहे.

  गरीबीवर मात करत ती बनली चार्टड अकाऊट कल्याण

  प्रचंड इच्छाशक्ती, ध्येय आणि मेहनत करण्याची तयारी असली तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते हे कल्याणातील एका गरीबीचे चटके सोसत जगणाऱ्या तेजस्विनी सोगम या तरुणीने दाखवून दिले आहे. चार घरची धुणीभांडी करत संसाराचा गाडा रेटण्यास मदत करणाऱ्या माउलीला मात्र यामुळे गगन ठेंगणे झाले आहे.

  कल्याण पश्चिमेकडील शिवाजी नगर परिसरातील पारिजात चाळीत जेमतेम २५० चौरस फुटाच्या बैठ्या खोलीत पत्नी आणि ५ मुलासह राहणारे विकास सोगम दुकानात सेल्समनचे काम करून आपल्या संसाराचा गाडा ओढतात. तर पत्नी विश्वाली चार घरची धुनीभाडी करत संसाराला हातभार लावते. शिक्षणाची प्रचंड आवड असतानाही आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला शिकता आले नाही मात्र आपल्याला कितीही काबाडकष्ट करावे लागले तरी चालतील आपण आपल्या मुलांना शिकवायचेच या ध्येयाने झपाटलेल्या विश्वाली यांनी आपल्या सर्व मुलांना चांगले देण्याचा विडा उचलला होता. त्यांची मोठी मुलगी तेजस्विनी सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होती. यामुळे तिला चांगले शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

  आई वडीलांच्या प्रोत्साहनामुळे गरिबीची चिंता न करता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करत तेजस्विनीने यशाला गवसणी घातली आहे. शिशुविकास शाळेतून १० वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर बिर्ला महाविद्यालयातून तिने पदवी पर्यतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर सी ए होण्याची जिद्द करत आयसीएआय मध्ये प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाची जवळपास ३७ हजार रुपयाची फी भरण्याचे आव्हान होते मात्र आई ज्यांच्याकडे धुनीभाडी करते त्या रेल्वेतून निवृत्त झालेल्या प्रवीण बिवलकर, राजेश दीक्षित, गोखले काका यासारख्या दानशूर व्यक्तींनी तेजस्विनीच्या हुशारीला आर्थिक मदतीचा हात दिला. फी साठी लागणारी सर्व प्रकारची आर्थिक मदत करत तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

  सी एची परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेसची हजारो रुपयाची फी भरणे आवाक्याबाहेर असल्याने तेजस्विनीने युट्युबची मदत घेत अभ्यास सुरु केला. दोन टप्प्यात परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालण्यासाठी तिने सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजेपर्यत केवळ अभ्यास करण्यावर भर दिला. वर्षभर स्वताला कोंडून घेत युट्यूबच्या मदतीने तिने आपल्या जीवनातील अंधकार दूर केला आहे. गोल्डन पार्क मध्ये राहणाऱ्या राजेश दीक्षित यांनि त्यांचे रिकामे घर तेजस्विनीला अभ्यासासाठी उघडून दिले यामुळे तिला कोणतीही व्यत्यय न येता अभ्यास करणे सोयीचे बनल्याचे ती सांगते. तेजस्वीनिची दुसरी बहिण शेअर मार्केटीगचा अभ्यास करत असून तिसरी बहिण नर्स आहे तर चौथी बहिण पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असून भाऊ यंदा ११ वीत आहे.

  कल्याण पश्चिमेचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी तेजस्विनी व तिच्या आई वडीलांचा शनिवारी शाल श्रीफळ देत सत्कार केला. व तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीचा खर्च आपण उचलणार असे सागंत शुभेच्छा दिल्या.

  या प्रसंगी गरीबीतून कबाडकष्ट करीत आपल्या लेक तेजस्विनी ला समाजातील काही दानशूर व्यक्तीच्या मदतीमुळे आपल्या स्वप्नाना पंख मिळविण्याचे सामर्थ्य लाभल्याचे सांगताना तिच्या आईचे डोळ्यातील आलेले अश्रू गरीबीची परिस्थिती बद्दल व्यथा काय असतात हे चित्र सागंत होते.