Omycron's first patient in Maharashtra found in Dombivali; No corona vaccine was given

ओमायक्रॉनचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीत सापडला आहे. या रुग्णाने कोरोनाची एकही लस घेतली नव्हती अशी माहिती केडीएमसी चे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली(Omycron's first patient in Maharashtra found in Dombivali; No corona vaccine was given).

    ठाणे : ओमायक्रॉनचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण डोंबिवलीत सापडला आहे. या रुग्णाने कोरोनाची एकही लस घेतली नव्हती अशी माहिती केडीएमसी चे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली(Omycron’s first patient in Maharashtra found in Dombivali; No corona vaccine was given).

    हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेच्या केपटॉन हुन प्रवास करुन आला होता. याची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून या रुग्णामध्ये ओमायक्रोनचे व्हेरिएंट सापडले असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगीतले.

    या रुग्णाच्या संपर्कात आलेले हायरिस्क लो रिस्क सर्व जणांची कोरोना टेस्ट केली. विमानातील सह प्रवाशांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांच्या नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. ज्या ओलाने ते आले त्या चालकाचे रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. लोकांना अजिबात घाबरण्याची गरज नाही. फक्त काळजी घेणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले.