वाशी खाडी पुलावर मोटरमनला रेल्वे ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी दिसली अन्…

नवी मुंबई : एक २१ वर्षीय तरुणी वाशी ब्रीज रेल्वे रुळाजवळ बेशुद्ध अवस्थेत रेल्वे पोलिसांना आढळून आली. या तरुणीवर उपचार सुरु असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मंगळवारी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान येथून लोकल घेऊन जाणाऱ्या मोटरमनला ही तरुणी दिसली. यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. वाशी रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या तरुणीला उचपारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पीडितेची प्रकृती सध्या स्थीर आहे. मात्र अजुनही पीडिता बोलण्याच्या अवस्थेत नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.  या तरुणीवर अत्याचार करुन तीला रेल्वे रुळावर फेकून दिल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस आणखी तपास करत आहेत.