मालमत्ता कर न भरणाऱ्यांना यापूढे एक टक्के व्याज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने संबंध शहरातील नागरिकांना हा मोठा दिलासा असणार असून; पालिकेला देखील थकीत मालमत्ता कर वसुली करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची चर्चा यानिमित्ताने रंगलेली पाहण्यास मिळाली.

  नवी मुंबई :  मालमत्ता कर  न भरणाऱ्यांना पालिकेकडून वर्षाला २४ टक्के व्याज आकारले जाते. म्हणजे महिन्याला दोन टक्के पालिका त्यावर व्याज आकारते. मात्र हा व्याजदर जास्त असून; यापूढे व्याजदरात ५० टक्क्यांची कपात करून वार्षिक १२ टक्के, महिन्याला एक टक्के व्याज पालिकांनी घ्यावे.  त्याबाबत मंत्री मंडळाच्या बैठकीत नवा प्रस्ताव आणला जाईल असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

  उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने संबंध शहरातील नागरिकांना हा मोठा दिलासा असणार असून; पालिकेला देखील थकीत मालमत्ता कर वसुली करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची चर्चा यानिमित्ताने रंगलेली पाहण्यास मिळाली.

  महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अजित पवार महिन्यातील दर गुरुवारी नवी मुंबई शहराला भेट देत आहेत. त्यांनी गुरुवारी महापालिकेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध प्रकल्पांची आणि उपाययोजनांची माहिती दिली. कोविडमुळे विकासकामे रखडलेली आहेत. त्यामुळे कोणतेही नवे प्रकल्प पालिकेने आणलेले नाहीत. त्यामुळे जुन्याच योजनांचा पुनरुच्चार आयुक्त बांगर यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्याने तीच माहिती अजित पवारांनी पत्रकार परिषदेत दिली.

  यात मोरबे धरणाची उंची वाढवणे, वैद्यकीय महाविद्यालय काढणे, नर्सिंग कोर्स पूर्ण करणे, सीएनजी बस खरेदी करणे, इलेक्ट्रिक बस खरेदी करणे, मलनिःसारण केंद्रातील पाणी गार्डनला वापरणे, कोविडची तिसरी लाट येण्याआधीच तिप्पट ऑक्सिजन व खाटांचे नियोजन करणे, देशी झाडे लावण्यावर भर देणे आदी विविध प्रकल्प हे महापालिकेने नियोजन केलेले जुनेच प्रकल्प आहेत. याच प्रकल्पांबाबत आपण अधिकच्या सूचना केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

  भाजपाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या घोषणेला धक्का

  साडे पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात सूट मिळणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कोविडमुळे सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत कोणतेही सरकार असो. राज्य अथवा केंद्र सर्वांना कराची गरज आहे. अशा परिस्थितीत नागरिकांवर सवलतींची खैरात देणे शक्य नाही असे मत अजित पवारांनी व्यक्त।केल्याने, निवडणुका डोळ्यांत।ठेवून नवी मुंबईत भाजपाने केलेली कर सवलतीच्या कल्पनेला धक्का बसण्याची शक्यता आहे.