sachin waze car

सचिन वाझे(sachin waze) वापरत असलेली अजून एक आलिशान गाडी NIA ने ताब्यात(NIA found outlander car of sachin waze) घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे.

    खारघर : मुकेश अंबानी(mukesh ambani) यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे वापरत असलेली अजून एक आलिशान गाडी NIA ने ताब्यात(NIA found outlander car of sachin waze) घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती. या गाडीची माहिती मिळाल्यानंतर NIAने ती ताब्यात घेतली आहे.

    कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून ही गाडी पार्क करुन ठेवण्यात आली होती. बरेच दिवस गाडी पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी गाडीची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाचा व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं. NIAला याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास केला जात आहे.

    दरम्यान, NIAने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित २ मर्सिडीज, १ प्राडो, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण ६ गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. NIA या ६ गाड्यांव्यतिरिक्त एक आऊटलँडर, ऑडी आणि स्कोडा गाडीच्या शोधात असल्याची माहिती मिळाली आहे.