taal bar kalyan crime

ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह(Crime By Police) सहा जणांनी गोंधळ घातला.(Police Created Scene In Bar) यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा, अशी धमकी(Threatening To Bar Manager) बार मॅनेजरला दिली.

    कल्याण : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह(Crime By Police) सहा जणांनी गोंधळ घातला.(Police Created Scene In Bar) यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली.(Threatening To Bar Manager) कल्याणच्या ताल बारमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या(Kalyan Crime) महात्मा फुले पोलीस ठाण्यात(Mahatma Phule Police Station) या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे.

    टिटवाळ्यामध्ये राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखरसोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. रात्री बार मध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवा, अशी मागणी बार मॅनेजरकडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या ६ जणांनी बारमध्ये धिंगाणा सुरू केला.

    जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता. गाणे सुरू करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसनची रिव्हॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहाजण बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. आज या ६ जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत.