थर्टीफस्टसाठी  जम्बो पोलीस बंदोबस्त, ठाण्यात ४ हजार ७५०  पोलीस या ठिकाणी असणार तैनात

थर्टीफर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागत यासाठी ठाण्यात वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ठाणे पोलीस  सर्व नाके, चौक येथे नाकाबंदी केलीय. मौजमजेसाठी रस्त्यावर उतरणारे, हद्दीतील हॉटेल्स, बार, पब्स,रिसॉर्ट, लॉजिंग आदी आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. तर येऊर,  उपवन ,कोलशेत खाडी,  तलावपाळी, सोसायटीच्या परिसरात गर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी घरी राहण्याचं आवाहन केले आहे.

ठाणे : थर्टीफस्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे पोलिसांनी जम्बो ऍक्शन प्लॅन तयार केला असून ठाणे पोलीस आयुक्तालयात तब्बल ४ हजार ७५०  पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह ३०० होमगार्ड आणि ३ एस.आर.पी.एफ च्या तुकड्या  येणार आहेत. वाहनचालक, हॉटेल्स, पब,रिसॉर्ट. लॉजेस आदींची तपासणी करण्यात येणार आहे. ठिकाठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

थर्टीफर्स्ट आणि नव्या वर्षाचे स्वागत यासाठी ठाण्यात वागळे इस्टेट, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ठाणे पोलीस  सर्व नाके, चौक येथे नाकाबंदी केलीय. मौजमजेसाठी रस्त्यावर उतरणारे, हद्दीतील हॉटेल्स, बार, पब्स,रिसॉर्ट, लॉजिंग आदी आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. तर येऊर,  उपवन ,कोलशेत खाडी,  तलावपाळी, सोसायटीच्या परिसरात गर्दी करणाऱ्या लोकांना पोलिसांनी घरी राहण्याचं आवाहन केले आहे.

तर ठाण्यातील काही उड्डाणपूल ३१ डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत.   ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत  ४ हजार ७५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात पोलीस उपायुक्त-५, सहाय्यक पोलीस आयुक्त-१७, पोलीस निरीक्षक-१२८, सहाय्यक पोलीस निरीक्षक-१५० पोलीस उपनिरीक्षक अंमलदार-३५००, महिला अंमलदार-९५०, होमगार्ड-३००, एस.आर.पी.एफ -३ तुकड्या, आर.सी.पी. प्लाटून-२ तुकड्या, स्ट्राईक मोबाईल-१०  असा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

थर्टीफस्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठाणे पोलिसांनी जम्बो ऍक्शन प्लॅन बनविले असून रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असल्याने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या, सोशल डिस्टन्सचे उल्लंघन, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, रात्री विनाकारण मद्य प्रश्न करून गाड्या मधून  भिरभिरणाऱ्या, रोडरोमियो, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि बंदोबस्तासाठी पोलिसांचा मोठा  ताफा कार्यरत राहणार आहे.  ठाणे पोलिसांनी चोख बंदोबस्त करून आणि नाकाबंदी करून नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या मद्यपींचा चक्काजाम करून टाकला आहे.