यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांना मॉर्निंग वॉक पडतोय महागात, नागरिकांनो फुफ्फुस सांभाळा

या सर्वेक्षणानुसार खारघर, तळोजा आणि पनवेल या भागात सकाळच्या वेळी सर्वाधिक प्रदुषण असल्याचं दिसून आलंय. सकाळच्या वेळी चालायला, धावायला किंवा इतर व्यायामांसाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. हवेतील प्रदुषण करणाऱ्या कणांचं प्रमाण सकाळच्या वेळी जास्त असल्यामुळे बाहेर पडणाऱ्यांच्या तब्येतीवर हे कण विपरित परिणाम करू शकतात, असं निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.

मुंबईतीलील कुर्ला, चेंबूर आणि बीकेसी या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून प्रदुषणाचं प्रमाण वाढलेलं असून या भागातील नागरिकांना त्याच त्रास होत आहे. मात्र आता प्रदुषणानं आपला मोर्चा नवी मुंबईकडं वळवल्याचं चित्र आहे. खारघर, तळोजा आणि पनवेल या भागात हवेची गुणवत्ता कशी आहे, याची तपासणी करण्यात आली. त्यात हे धक्कादायक खुलासे झालेत.

या सर्वेक्षणानुसार खारघर, तळोजा आणि पनवेल या भागात सकाळच्या वेळी सर्वाधिक प्रदुषण असल्याचं दिसून आलंय. सकाळच्या वेळी चालायला, धावायला किंवा इतर व्यायामांसाठी बाहेर पडणाऱ्यांसाठी ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे. हवेतील प्रदुषण करणाऱ्या कणांचं प्रमाण सकाळच्या वेळी जास्त असल्यामुळे बाहेर पडणाऱ्यांच्या तब्येतीवर हे कण विपरित परिणाम करू शकतात, असं निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.

या अभ्यासानुसार सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५, कणांची पातळी जास्त नोंदवली गेलीय. पीएम २.५ हे अत्यंत सूक्ष्म कण असतात आणि सहजरित्या आपल्या शरीरात प्रवेश करतात. हे कण फुफ्फुसात अडकून आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतात. त्यामुळे श्वसनाशी संबंधित आजार होऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. दृष्यमानता कमी होणे, धुरके तयार होणे हे प्रकारदेखील याच प्रकारच्या कणांमुळे घडत असतात.

तळोजा, पनवेल, खारघर आणि नावडे येथील वेगवेगळ्या ठिकाणी १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात हे सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी दिलीय. हवेची गुणवत्ता तपासणे आणि सरकारी यंत्रणा या विषयाकडं करत असलेलं दुर्लक्ष अधोरेखित करणे, हेच यामागचे हेतू असल्याचं ते म्हणाले.