mahesh nimbalkar mumndan

डोंबिवली : पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर हे अनधिकृत(illegal jain temple) असल्याचा आरोप करत १२ दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते.या आंदोलनाच्या १३ व्या दिवशी त्यांनी मुंडण केले.

डोंबिवली : पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर हे अनधिकृत(illegal jain temple) असल्याचा आरोप करत १२ दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले होते. मात्र पोलिसांनी आंदोलन करण्यास अटकाव केल्याने निंबाळकर यांनी त्या मंदिराच्या समोर पालिकेचा जाहीर निषेध केला.  बॅनर हाती घेऊन आंदोलन करत गुरुवारी या आंदोलनाच्या १३ व्या दिवशी त्यांनी मुंडण केले. प्रशासनाने आंदोलनाची दाखल न घेतल्यास आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.

निंबाळकर यांनी १३ दिवसांपूर्वी  आंदोलनाला सुरुवात केली. जैन मंदिरापासून ते पालिकेच्या विभागीय कार्यालयापर्यत चालत येत असताना डोंबिवली रामनगर पोलिसांनी त्यांना आंदोलन करताना थांबवत ताब्यात घेतले होते. परंतु हे आंदोलन सुरुच राहणार असून मंदिर ते विभागीय कार्यालय असे अर्धनग्न अवस्थेत चालत जाणार असल्याचे सांगितले होते. सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर हे अनेक वर्षापासून डोंबिवली पूर्वेकडील कस्तुरी प्लाझा जवळील जैन मंदिर अनधिकृत असल्याचा आरोप करत यावर पालिका प्रशासन का कारवाई करत असा जाब विचारला होता. त्यावर कारवाई होत नसल्याचे सांगत निंबाळकर यांनी काही वर्षापूर्वी डोंबिवली विभागीय कार्यालयात अर्धनग्न अवस्थेत ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. मात्र जोपर्यत कारवाई होत नाही तोपर्यत आंदोलन करतच राहणार असे निंबाळकर म्हणाले.

निंबाळकर यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचे आंदोलन केले होते.मंदिरासमोर आल्यावर त्यांनी अर्धनग्न अवस्थेत चालत जात असताना पोलिसांनी अडविले. मात्र आंदोलन करण्यास का अटकाव करता असा प्रश्न निंबाळकर यांनी पोलिसांना विचारला होता. पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता  त्यांना रिक्षात बसवून डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात आणले. पुढील सात दिवस आपले आंदोलन सुरु राहणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. गुरुवारी निंबाळकर यांनी पालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात मुंडण करून केले.