भिवंडीतील राहनाळ येथील केमिकल गोदामाला भीषण आग

भिवंडी: तालुक्यातील राहनाळ ग्राम पंचायत हद्दीतील दौलत कंपाउंड येथील एका केमिकल गोदामाला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास भीषण आग लागली. या परिसरात गोदामात व गोदामाच्या बाहेर असलेल्या मोकळ्या

 भिवंडी:  तालुक्यातील राहनाळ ग्राम पंचायत हद्दीतील दौलत कंपाउंड येथील एका केमिकल गोदामाला बुधवारी दुपारी २ च्या सुमारास भीषण आग लागली. या परिसरात गोदामात व गोदामाच्या बाहेर असलेल्या मोकळ्या जागेत केमिकलचे ड्रम ठेवण्यात आले होते. अचानक या ड्रमला आग लागल्याने केमिकल गोदामाच्या आगीने भीषण रूप धारण केले आहे. भीषण आग लागल्याने केमिकलच्या ड्रमचे जोरजोरात स्पोट होत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीचे नेमकी कारण समजले नसले तरी या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी आणि कल्याण मनपा अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भिवंडीतील केमिकल गोदामांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात आगीच्या घटनेतून मोठी जीवितहानी होण्याचा धोका वारंवार व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याकडे शासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची बाब अनेक वेळा स्पष्ट होत आहे.